12 जुलै रोजी भुवैकुंठ पंढरी नगरीमध्ये आषाढी वारीनिमित्त लाखो वैष्णवांचा मेळा जमणार आहे. आषाढी वारीच्या या सोहळ्यासाठी संपुर्ण देशातुन व विदेशातुनही अनेक विठ्ठल भक्त येत असतात. लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकरी भाविक व विठ्ठल भक्तांना या कालावधीत श्रीविठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेणे सुलभ जावे यासाठी दि. 4 ते 22 जुलै या कालावधीत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. या वर्षी आषाढीसाठी 15 लाखाहुन अधिक भाविक पंढरीत दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.






0 Comments