दुर्दैवी घटना- सोलापूर जिल्ह्यात वीज पडून तिघांचा मृत्यू.. दोघेजण जखमी


सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज सोमवारी दि.१जुलै रोजी दुपारी साधारण दोनच्या सुमारास घटना घडली असल्याचे समजते.
पंतूसिंग जीवनसिंग रजपूत (वय वर्षे ४०), संकेत शिवानंद चौरमोले (वय वर्षे १७), पार्वती मलप्पा कोरे (वय वर्षे ४४) यांचा मृत्यू झाला. तर रविकांत राजकुमार मुळे (वय वर्षे ९३) व धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे (वय वर्षे ९२) हे दोघे जण जखमी आहेत.जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
 पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंद्रुप गावावर शोककळा पसरली आहे.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments