स्वेरीत शैक्षणिक कर्जासंबंधी माहिती देताना आवाहन बँक ऑफ इंडिया, पंढरपूर शाखेचे मार्केटींग मॅनेजर आशुतोष शर्मा सोबत स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, फामसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, उपप्राचार्य डॉ. दिनकर यादव, डॉ. राजकुमार कदम, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार आदी.
गरजू विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जाचा फायदा घ्यावा. - मार्केटींग मॅनेजर आशुतोष शर्मा
पंढरपूर- ‘आज उच्च तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मुबलक रकमेची गरज असते आणि अशा परिस्थितीत केवळ पैसा ही बाब पुढे करून अनेकांना शिक्षणावर पाणी फेरावे लागेल अशी आता परिस्थिती राहिली नाही. यासाठी काही राष्ट्रीयकृत बँका शैक्षणिक कर्ज देण्यासाठी पुढे सरसावल्या असून त्याचा फायदा गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा. अनेक पालक व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाची सुविधा असते हे माहितच नसते. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असताना देखील शिक्षण अर्धवट सोडावे लागते. त्यामुळे शासनाने उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक कर्ज अक्षरशः कोणी न घेतल्यामुळे शासनाच्या तिजोरीत पडून राहते. तरी गरजू विद्यार्थ्यांनी याचा फायदा घावा.’ असे आवाहन बँक ऑफ इंडिया, पंढरपूर शाखेचे मार्केटींग मॅनेजर आशुतोष शर्मा यांनी केले.
स्वेरीत शैक्षणिक कर्जाची माहिती देण्यासाठी पंढरपूर बँक ऑफ इंडियाचे मार्केटींग मॅनेजर आशुतोष शर्मा आले होते. प्रथम संस्थचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी त्यांचे स्वागत करून उपस्थितांना त्यांचा परिचय करून दिला. पुढे बोलताना ब्रांच मॅनेजर आशुतोष शर्मा म्हणाले की, ‘फार पूर्वी पासून शैक्षणिक कर्जाची सुविधा होती. परंतु कर्जावरील व्याज अधिक रकमी वसुल होईल या व अशा अनेक गोष्टीची भीती बाळगून होते. त्यामुळे फारसे कोणी कर्ज घेत नव्हते त्यासाठी शिक्षण अर्ध्यावर थांबवत होते. आता या सुविधेमध्ये अनेक बदल झाले असून उत्तीर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यानेच कर्ज फेडायचे असून यासाठी अत्यंत माफक व्याज आकारले जाते. तरी आपल्या परिचयाचे अथवा ज्यांना याची माहिती नाही त्यांना या शैक्षणिक कर्जाच्या सुविधेची माहिती देवून उपकृत करावे.’ असे शर्मा यांनी सांगितले. गेल्या वर्षी रु.१२५ कोटींची तरतूद असताना केवळ २५ कोटींची शैक्षणिक कर्जे विद्यार्थ्यांनी घेतले. असेही विशेष त्यांनी नमूद केले. स्वेरीत कर्ज सुविधेविषयी सविस्तर माहिती देण्याच्या निमित्ताने मार्केटींग मॅनेजर आशुतोष शर्मा आले होते. भारतात शिक्षणाचा अधिकार (राईट टू एज्युकेशन) लागू झाल्यापासून पाल्य आणि पालक चांगले शिक्षण घेण्यासाठी शक्य असलेले सगळे प्रयत्न करतात.
गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत आणि पर्यायाने शिक्षणासाठी लागणारा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाऊन पोहोचला. यासाठी बरेच लोक म्युच्वल फंड , फिक्सड डीपोझीट, रियल ईस्टेट यामध्ये गुंतवणूक करून शिक्षणासाठी तजवीज करून ठेवतात. तरीही बऱ्याच लोकांसाठी इतके महाग झालेले शिक्षण घेणे कठीण होऊन बसते. यासाठी भारतातील बँक एज्युकेशन लोन म्हणजेच शैक्षणिक कर्ज पुरवतात. प्रवेश घेतांना कधीही आपण मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेत आहोत का याची खात्री करून घ्यावी. कारण संस्था मान्यताप्राप्त नसल्यास अर्ज नामंजूर होऊ शकतो. असे अनेक माहिती त्यांनी देवून कर्ज कसे मिळविता येते यासाठी आवश्यक कागदपत्रे, किती मर्यादेपर्यंत कर्ज मिळते याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शैक्षणिक शैक्षणिक कर्जासंबंधी अधिक माहिती साठी www.bankofindia.in वwww.vidhyalakshmi.co.in या संकेत स्थळाला भेट द्यावी असेही शर्मा यांनी सांगितले. यावेळी डॉ. राजकुमार कदम, स्वेरीचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, अभियांत्रिकीसह इतर तीनही महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




0 Comments