पाणी पुरवठा, स्वच्छतेच्या नियोजनावर वारीमध्ये भर
अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या कार्यवाही करण्याच्या सूचना
अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या कार्यवाही करण्याच्या सूचना
पंढरपूर दि. 27 :- आषाढी यात्रा कालावधीत संबधित यंत्रणेने सतर्क राहून , पाणी पुरवठा व स्वच्छतेचे योग्य नियोजन करावे. तसेच पालखी सोहळ्या समवेत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा देण्याबाबत योग्य नियोजन करा अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिल्या.
आषाढी यात्रेच्या पुर्व तयारी बाबत आज प्रांत कार्यालय , सांस्कृतिक भवन पंढरपूर येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, शमा ढोक-पवार, ज्योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, तहसिलदार मधुसूदन बर्गे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे,गटविकास अधिकारी रवी किरण घोडके, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे बोलताना म्हणाले, आषाढी यात्रेसाठी येणा-या भाविकांना सोयी सुविधां उपलब्ध करुन देण्याबाबत प्राधान्य द्यावे. पालखी मार्गावर ग्रामीन पाणी पुरवठा विभागाने टँकर भरण्याच्या ठिकाणची पाहणी करुन पाणी उपलब्धतेबाबत नियोजन करावे. आरोग्य विभागाने औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध करवा, आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करावेत. वैद्यकीय पथक नेमलेल्या ठिकाणा बाबतची प्रसिध्दी करावी . नगर पालिका विभागाने 65 एकर, वाळवंट स्वच्छ पिण्याचे उपलब्ध करावे, तसेच शहरात व मंदीर परिसरात स्वच्छता राहिल याची दक्षता घ्यावी. 65 एकर मध्ये प्लॉटचे वाटप करताना संबधितांना प्लॉटचे नंबर उपलब्ध करुन द्यावेत. शहरातील धोकादायक इमारती वर ठळक अक्षरात दक्षतेबाबतच्या सुचना फलक लावावेत. वीज वितरण विभागाने वारी कालावधीत अखंडीत व सुरक्षित वीज पुरवठा करावा. वाहतूक व पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याबाबत नियोजन करावे. पाटबंधारे विभागने वेळेत कॅनालला पाणी सोडण्याचे नियोजन करावे.
प्रशासना मार्फत 2 जुलै 2019 रोजी प्रदक्षिणामार्ग व मंदीर परिसराची स्वच्छता करण्यात येणार असून, या स्वच्छता मोहिमेत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी यावेळी केले.

पाण्याचे टँकर भरण्याच्या ठिकाणची माहिती पोलीस विभागाला द्यावी जेणेकरुन पाणी भरण्यासाठी जे टँकर जातील त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवता येईल . तसेच पालखी तळावर तात्पुरते स्टॉलधारकांना आवश्यक परवाने ग्रामपंचातीने द्यावेत असे अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
नगरपालीकेन नदीपात्र व 65 एकर मध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, भंडीशेगाव पालखी तळावरील खड्डे बुजवावेत तसेच मंदीर परिसर व इतर आवश्यक ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी मंदीर समिती मार्फत 200 स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
या बैठकीत अन्न व औषध , एस.टी.महामंडळ, पाटबंधारे विभाग, रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा आढावा घेवून संबधितांना आवश्यक सुचना करण्यात आल्या.





0 Comments