स्टेशन रोडवरील फुटपाथ कमी करण्याचेही आदेश
पंढरपूर :- दि. 26 जुन 2019 ठजगळ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रात्री पंढरपूर येथील स्टेशन रोड भागास भेट दिली. यावेळी स्टेशन रोडवरील फूटपाथ कमी करावा व शहरातील सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत व रस्त्यावरील जाहिरात, होर्डिंग्ज काढणेबाबत सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, अभियंता नेताजी पवार, आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे ,नागनाथ तोडकर,अव्वल क्लार्क श्रोेत्री, नगररचना अभियंता सय्यद आदी उपस्थित होते.





0 Comments