अकलुज : प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत अकलुज जि.सोलापूर येथील रत्नाई कृषि महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभव आलेल्या कृषिदुतांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
हे विद्यार्थी शिक्षण प्रसारक मंडळ ,अकलुज अध्यक्ष मा.श्री. जयसिंह मोहिते-पाटील ,महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी. कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलवडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.आर.आडत, प्रा.डी.एस. मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमात प्रतिमा पुजन सरपंच सौ.रेखा दिलीप माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच सौ.मनिषा शशिकांत सुर्यवंशी, आदिनाथ कांबळे, शंकर शेंडे, बाळासाहेब गायकवाड, पोलिस पाटील बापूराव रासकर, सुभाष जाधव, वसंत कांबळे यांच्यासह निरवांगी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार व मनोगत व्यक्त करण्यात आली.
येणार्या पुढील दिवसांत विविध गावातील शेतकर्यांसाठी माती-पाणी परिक्षण, सेंद्रिय शेती, खतव्यवस्थापन, जलव्यवस्थापन,वृक्षारोपण, गांडूळखत निर्मिती, आधुनिक पीक पध्दती, किड व रोग, यासारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
या ठिकाणी रत्नाई कृषि महाविद्यालयातील निरवांगी येथील कृषिदुतांच्या गटात दिनानाथ भाकरे, तुषार देवकर,मयूर कोरटकर,ओंकार निकम, प्रशांत माळी, मनोज म्हेत्रे, अविनाश पवार, अक्षय सट्टे, दिपक नवले हे विद्यार्थी सामील झाले होते.





0 Comments