पुण्यातून उद्या दोन दिवसाचा मुक्काम संपवून श्रीसंत तुकाराम महाराज आणि श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहेत. या दोन्ही पालख्या पुण्यात नानापेठ व भवानी पेठेत मुक्कामी होत्या. श्रीसंत तुकाराम महाराज यांची पालखी निवडूंगा विठोबा मंदिरात तर श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी होती. त्याची तयारी दोन्ही मंदिरात जोरदार केलेली होती. दोन दिवस मुक्काम असल्याने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली पहायला मिळाली. आज पहाटे दोन्ही पालख्या हडपसर पर्यत एकत्र जातील व त्या ठिकाणाहुन वेगवेगळ्या रस्त्याने मार्गस्थ होतील.





0 Comments