पंढरपूर:- कर्मवीर औंदुबरआण्णा पाटील चॅरीटेबल ट्रस्ट संचलित श्री विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूर येथे मा. आ. संस्थापक चेअरमन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व श्री विठ्ठल हॉस्पिटल पंढरपूरचे कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांची 19 वी पूण्यतिथी साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने कर्मवीर औदुंबररावजी पाटील चॅरीटेबल ट्रस्ट संचलित श्री विठ्ठल हॉस्पिटलचे मा. उपाध्यक्ष डॉ. विरेंद्र अमरनाथ व्होरा, एम.डी.फिजिशियन यांच्या हस्ते कर्मवीर औदुंबरआण्णांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले विचार मांडताना आण्णांचा हॉस्पिटल काढण्याचा जो उद्देश होता त्या उद्देशास अनूसरून सध्या हॉस्पिटल चांगल्या प्रतिची सेवा देत आहे. गरीब व गरजू रूग्णांना अल्प दरात सेवा दिली जात असून त्याचा गोर गरीब रूग्णांना फायदा होत आहे असे सांगितले. या निमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष युवराजदादा पाटील यांनी केले. त्यात त्यांनी संस्थेच्या झालेल्या कामाची व नियोजित कामाची माहिती दिली. तसेच भूपेंद्र रणदिवे, रायाप्पा हळणवर, संदिप मांडवे यांनी आपले आण्णांविषयी विचार मांंडले.व त्यांच्या कार्याचा उल्लेख केला.
सदर कार्यक्रमास चंदूलाल शहा शेठजी, हरीदादा घाडगे, भारत भोसले, शांतीनाथदादा बागल, दिनकरबापू पाटील, शहाजी साळूंखे, राजेंद्र शिंदे, मानसिंग चव्हाण, आर.डी. पवार, आनंत पाटील, वसंत चव्हाण, शरद चव्हाण, जिवराज चव्हाण, सुभाष हुंगे - पाटील, राजेंद्र भोसले, सुधिर भोसले, दादासाहेब फतेपूरकर, सोमनाथ आंबरे, नगरसेवक प्रशांत शिंदे, डि.राज.सर्वगोड, संजयआप्पा भिंगे, डॉ. रोकडे, डॉ. दिक्षित, डॉ. लाड, डॉ. जमदाडे व सर्व आण्णाप्रेमी उपस्थित होते. यावेळी खजिनदार प्रविण भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.





0 Comments