पंढरपूर दि. 27 :-  आषाढी यात्रेसाठी  जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांना आवश्यक सेवा व सुविधेची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आषाढी यात्रा मार्गदर्शिका 2019 काढण्यात आली आहे. या मार्गदर्शिकेचे प्रकाशन अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रांत कार्यालय पंढरपूर येथील सांस्कृतिक भवन येथे  मार्गदर्शिकेचे प्रकाशनावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सागर कवडे, तहसिलदार मधुसूदन बर्गे, मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते.
आषाढी यात्रा  मार्गदर्शिकेत  पालखी मार्गावरील सर्व  शासकीय अधिका-यांचे संपर्क क्रमांक, शासकीय कार्यालयाचे संपर्क क्रमांक, पालखी मार्गावरील आपत्ती प्रतिसाद केंद्र (EOC). पालखी मार्गावरील संबधित ग्रामपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, केरोसिन हॉकर्स व गॅस वितरक,  बस स्थानक व्यवस्था , रेल्वे  वेळा पत्रक, पंढरपूर शहरातील मठ व इतर निवासस्थाने यांचे संपर्क  तसेच शहरातील खाजगी डॉक्टर यांचे संपर्क क्रमांक आहेत.   
या मार्गदर्शिकेमुळे भाविकांना तसेच संबधित अधिकारी, कर्मचारी व नागरीकांना आवश्यक माहिती सहज उपलब्ध होणार असल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com