सिंहगडच्या १० विद्यार्थ्याची ‘सॅट्रीक्स इन्फॉरमेशन सेक्युरीटी’ कंपनीत निवड


        पंढरपूर (प्रतिनिधी) ‘सॅट्रीक्स इन्फॉरमेशन सेक्युरीटी प्रा. लि. कंपनीने पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या मुलाखती घेऊन १० विद्यार्थ्याची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
       अल्पावधीतच अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात दमदार वाटचाल करीत असून विद्यार्थी व पालक यांच्या विश्वासास पात्र राहून अभियांत्रिकी क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. या सर्वामुळेच सिंहगड मधील विद्यार्थी सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्सची सर्वोत्तम अंमलबजावणी करण्यासाठी सुरक्षा शृंखलामध्ये लोकप्रक्रिया आणि तंत्रज्ञान मध्ये कार्यरत असलेल्या ‘सॅट्रीक्स इन्फॉरमेशन सेक्युरीटी प्रा. लि. कंपनीत पंढरपूर सिंहगडच्या १० विद्यार्थ्याची मुलाखतीद्वारे निवड केली आहे.
         कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात ‘सॅट्रीक्स इन्फॉरमेशन सेक्युरीटी प्रा. लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सिंहगडच्या विद्यार्थ्याच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीमधून विद्यार्थ्याची गुणात्मक शैक्षणीक पात्रता, बौद्धिक चाचणी घेतली. यामध्ये विद्यार्थ्यानी अतिशय शिस्तप्रिय मुलाखत दिल्यानंतर कंपनीचे अधिकारी प्रभावित झाले. अधिकाऱ्यांनी अंतिम निवड प्रक्रियेतून पंढरपूर सिंहगडमधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील मोना जगताप, प्रतीक्षा देवमारे, कोमल लटके तसेच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील दिपाली कोरे, अमृता कुसुमडे, श्रद्धा घंटी, दिपाली पांढरे, स्नेहल आवटे, माधुरी पुजारी, अमोल मुळीक आदी विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे.
      ‘सॅट्रीक्स इन्फॉरमेशन सेक्युरीटी प्रा. लि. कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगेडॉ. चेतन पिसेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. नामदेव सावंतप्रा. श्रीनिवास गंजेवारडॉ.अल्ताफ मुलाणी, डॉ. शाम कुलकर्णी, प्रा. अनिल निकमप्रा. सोमनाथ कोळी, प्रा. भारत आदमिले, प्रा. दिपक कोष्टीप्रा. सुर्यकांत पाटीलप्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments