पंढरपूर नगरपरिषद व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्यावतीने पंढरपूर शहरातील विविध विकास कामांचा भुमीपुजन समारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष लतिका डोके, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, पाणीपुरवठा समिती सभापती रेहाना बोहरी, बांधकाम समिती सभापती सुजितकुमार सर्वगोड, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगर अभियंता दिनेश शास्त्री, अभियंता नेताजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रभाग क्र. 3 व 4 मधील 197 ब झोपडपट्टीतील अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे व पेव्हिंग ब्लॉक टाकणेचे काम र.रु.50 लक्ष 60 हजार व रामबाग पिछाडी नरहरी सोनार मठामार्फत रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण करणेचे काम 15 लक्ष 86 हजार कामाचा शुभारंभ या भागाचे नगरसेवक विक्रम शिरसट, नगरसेविका श्वेता डोंबे, अनुसया शिरसट, नगरसेवक सुरेश नेहतराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच प्रभाग क्र.15 मधील जि.प.ऑफीसच्या पश्चिमेपासुन मनिषा नगरकडे जाणा-या रस्ता पर्यंतचा दक्षिणोत्तर रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणे व जुना कराड नाका ते शेळके वस्ती रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण करणे या र.रु.54 लक्ष कामाचा शुभारंभ नगरसेवक महादेव भालेराव, आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर बंदपट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच प्रभाग क्र.13 मधील सहयोग सोसायटी देशमुख पेट्रोल पंप ते शासकीय वसाहत, परिचारक क्लासेस ते शिवयोगी मंगल कार्यालय रस्ता खडीकरण-डांबरीकरण करणेचे काम र.रु.55 लक्ष कामाचा शुभारंभ नगरसेवक प्रशांत शिंदे, अर्बन बँकेचे संचालक भाऊसो जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. तसेच प्रभाग क्र.12 मधील विश्वशांती नगर / इसबावी येथील दलित वस्तीमध्ये विविध ठिकाणी काँक्रीट करणे व पेव्हिंग ब्लॉक टाकणे काम र.रु.37 लक्ष कामाचा शुभारंभ नगरसेवक विशाल मलपे, शिक्षण समिती सभापती भाग्यश्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती शकुंतला नडगिरे, नगरसेविका रेणुका घोडके, नगरसेवक सुरेश नेहतराव, संजय निंबाळकर, विवेक परदेशी, मालोजी शेंबडे, श्रीनिवास बोरगावकर, सामाजिक कार्यकर्ते इब्राहीम बोहरी, गणेश अधटराव, नवनाथ रानगट, नरसिंह शिंगण, धर्मराज घोडके, अमोल डोके, संजय अभ्यंकर, शंकर पवार व या भागातील नागरिक हे उपस्थित होते.







0 Comments