सिंहगड मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करताना महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी. छाया चित्र -प्रमोद बनसोडे
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 294 वी जयंती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, प्रा. अनिल निकम आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
सामाजिक क्षेत्रात अहिल्यादेवी एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या म्हणीन प्रसिद्ध होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली मात्र शेतकर्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.
अश्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सिंहगड महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.





0 Comments