पुण्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रशिक्षणात लोटसच्या विद्यार्थ्यांचा सहभाग






पंढरपूर : श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित लोटस इंग्लिश स्कुल मधील इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी जान्हवी सोमनाथ माळी,वैष्णवी भारत नागणेतृप्ती कांतीलाल डुबल, प्रणव मुकुंद पवार आणि ऋशिकेष कालिदास गवळी यांनी इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंन्ड रिसर्च, पुणे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना घेतल्या जाणार्‍या ‘विज्ञान वाहिनीच्या’प्रशिक्षणासाठी उल्लेखनिय सहभाग नोंदवला. दिनांक १६ जून ते २० जून दरम्यान प्रशिक्षणाचा कालावधी पर्यंत होता. 
           या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात करियर करण्याविषयी मार्गदर्शन व त्या क्षेत्रातील संधीविषयी माहिती देणे होता. या क्षेत्रातील तज्ञ लोकांशी सुसंवाद साधणेवेगवेगळया ठिकाणी भेटी देणे हा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झाली म्हणून या विद्यार्थ्यांना संस्थासचिव डॉ. बी. पी. रोंगेसंस्थापक अध्यक्ष दादासाहेब रोंगेअध्यक्ष बी.डी. रोंगे व इतर विश्वस्त यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण,शिक्षकवृंद जान्हवी दिक्षितसंतोश गाढवे, सचिन निकम,अमरसिंह ठाकूरहृदयनाथ नामदे, संतोष पवार तसेच ज्युनियर कॉलेजचे विभागप्रमुख ज्ञानेश्वर वायदंडे यांनी मार्गदर्शन केले.




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments