स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगमधील ४ विद्यार्थ्यांची ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टम’ कंपनीत इंटरव्युवद्वारे निवड





पंढरपूरः- ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम पुणे’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूर संचलित डिप्लोमा इंजीनिअरिंगच्या ४ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे. 
      डिप्लोमा इंजिनिअरिंगने देखील डिग्री इंजिनिअरिंग प्रमाणेच गुणवत्ता आणि शिक्षणातील महत्व टिकवून ठेवले आहे. याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजे ४ विद्यार्थ्यांची निवड होय. ट्रान्सफर केसेस, टॉर्क कपलर्स, सिंक्रो नायझर्स आणि अॅटो लॉकींग हब या अॅटोमोबाईल वाहन या क्षेत्राशी निगडीत असलेल्या ‘दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम पुणे’ कंपनीसाठी करण्यात आली.दिवगी टॉर्क ट्रान्सफर सिस्टीम पुणे’ चे एच.आर. गोपाळ दळवी, विश्वास काजरेकर व त्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील डिप्लोमा इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील पृथ्वीजीत बाबर, नवनाथ मेहेर, सम्मिद माणगावे व सुदर्शन दुधाळे  या ४  विद्यार्थ्यांची कंपनीसाठी निवड झाली आहे. श्री विठ्ठल अभियांत्रिकी (पदविका) मध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण स्वेरीच्या पदवी अभियांत्रिकी प्रमाणेच होत आहे. सदर विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. सोमनाथ बागल तसेच पदवी अभियांत्रिकीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ आदी प्राध्यापकांचे बहूमोल मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेशतः पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा.सी.बी.नाडगौडा तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तडिप्लोमा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्यउपप्राचार्यविभागप्रमुखअधिष्ठाताप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्युवमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments