गिरवी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा




अकलूज(प्रतिनिधी)गिरवी: महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी अंतर्गत सोलापूर जिल्हा अकलूज येथील रत्नाई कृषि महाविद्यालयातील 'ग्रामीण कृषि कार्यानुभव' साठी आलेल्या कृषिदुतांनी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, गिरवी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला.
हे विद्यार्थी शिक्षण प्रसारक मंडळ,अकलूज अध्यक्ष मा.श्री जयसिंह मोहिते-पाटिल, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी.पी. कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलावडे, कार्यक्रम समन्वयक व कार्यक्रम अधिकरी प्रा.एस.एम.एकतपुरे, कार्यक्रम अधिकरी प्रा.एस.आर.आडत, प्रा.डी.एस.मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली 'आंतरराष्ट्रीय योग दिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.





या प्रसंगी कार्यक्रमात प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम.एस.मांगलकर सर, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.डी.शिंदे सर व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यावेळी यांच्यासह गिरवी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे सत्कार व मनोगत व्यक्त करण्यात आले.
या ठिकाणी रत्नाई कृषि महाविद्यालयातील गिरवी येथील कृषिदूतांच्या गटात अपूर्व सुर्वे, प्रविण नाळे, संग्राम पाटिल, सचिन लवळे, रणजितसिंह पवार, नानासाहेब बनसोडे, साई मनिष जुलूरी, हर्षवर्धन रेड्डी, महेंदर कोमा हे विद्यार्थी उपस्थित होते.



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments