पुण्यातील कोंढवा बुद्रुक परिसरात इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १७ मजुरांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे. कोंढव्यात तालाब कंपनीसमोर सिमाभिंत लेबर कँम्पवर ही संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत १६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ढिगाऱ्याखालून तिघांना जिवंत काढण्यात यश आले आहे. अद्याप बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.बचावकार्य सुरू असून चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे संवेदना व्यक्त केली आहे. तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत.
१६ मजुरांवर झोपेतच काळाने घाला घातल्याची घटना घडली. कोंढवा बुद्रुक परिसरात आल्कन स्टायलिश इमारतीची संरक्षक भिंत मजुरांच्या तात्पुरत्या बांधलेल्या पत्र्याच्या खोल्यांवर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. ही भिंत मोठी असल्यानं आणि कामगारांच्या खोल्या खड्ड्यात असल्याने मोठ्या प्रमाणात भिंतीचा ढिगारा घटनास्थळी पडला.
मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्येही मुलांचा समावेश आहे. या भिंतीला लागून मजुरांच्या कच्च्या झोपड्या होत्या. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
कोंढव्यात तालाब कंपनीसमोर सिमाभिंत लेबर कँम्पवर संरक्षक भिंत कोसळली. बिहारचे मजुर होते अशी माहिती मिळत आहे. ठार झालेले बाधंकाम मजुर होते. शेजारी सुरु असलेल्या इमारतीवर बाधंकाम मजूर म्हणून काम करत होते.
या दुर्घटनेतील मृतांची नावे आलोक शर्मा (२८), मोहन शर्मा (२४), अमन शर्मा (१९), रवी शर्मा (१९), लक्ष्मीकांत सहानी (३३), अवधेत सिंह (३२), सुनिल सिंग (३५), ओवीदास (२), सोनाली दास (६), भीमा दास (३८), संगीता देवी (२६), अजितकुमार शर्मा (७), रेखालकुमार शर्मा (५), निवा देवी (३०), दिपरंजन शर्मा अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बिहार आणि ओडिशामधील राहणारे आहेत.
या दुर्घटनेतील मृतांची नावे आलोक शर्मा (२८), मोहन शर्मा (२४), अमन शर्मा (१९), रवी शर्मा (१९), लक्ष्मीकांत सहानी (३३), अवधेत सिंह (३२), सुनिल सिंग (३५), ओवीदास (२), सोनाली दास (६), भीमा दास (३८), संगीता देवी (२६), अजितकुमार शर्मा (७), रेखालकुमार शर्मा (५), निवा देवी (३०), दिपरंजन शर्मा अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बिहार आणि ओडिशामधील राहणारे आहेत.
जबाबदार व्यक्तींवर कारवाई करणार
या दुर्घटनेबाबत चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना नियमानुसार शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व मदत कार्याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. कोंढवा येथील दुर्घटनेवरून प्रथमदर्शनी असे लक्षात येते की बांधकाम मजुरांसाठी जी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती, ती सुरक्षित नव्हती. जिल्हा प्रशासनाकडे या बांधकामविषयक सर्व माहिती उपलब्ध असून त्याची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.
मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करू – चंद्रकांत पाटील
कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.






0 Comments