पंढरपूर– येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४५ वी जयंती साजरी करण्यात आली.
राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमा पूजनानंतर एम.बी. ए.चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले की, ‘शाहू महाराजांनी शेतकऱ्यांसाठी स्वस्त दराने गवत मिळण्यापासून ते गोठ्याची सोईपर्यंत सर्व कार्यांना गती दिली. बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून विहिरीचे खोदकामे, तलाव, रस्ते, कालवे, ही कामे काढली. गरिबांच्या घरी दुष्काळात गरजू साहित्याचे वाटप, अनाथ, अपंग, वृद्ध व निराधार लोकांसाठी अन्नछत्रे देखील काढली. व्याकुळ झालेली लहान मुले देखील राजांच्या नजरेतून सुटली नाहीत. त्यांच्यासाठी पाळणाघराची व्यवस्था केली. नागरिकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी राजांनी जीवाचे रान करून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा केल्या. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली.’असे सांगून प्रा. पाटील यांनी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडून दाखविला. यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. संताजी पवार, डॉ. रंगनाथ हरीदार, प्रा. अमोल चौंडे, प्रा. शेख, प्रा. पंकज गायकवाड, प्रा. सचिन भोसले, नागेश ताडे, योगेश कदम यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




0 Comments