पंढरपूर दि.29- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘ डिजिटल इंडीया’ च्या निमित्ताने सोमवार दिनांक 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10.00 वाजता मुख्य डाकघर, पंढरपूर येथे आधार शिबीराचे आयोजन करण्यात येणार, असल्याचे पंढरपूर डाकघर विभागाचे अधिक्षक एन रमेश यांनी सांगितले.
या शिबीराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्या हस्ते तर गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे.
या शिबीरा मध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डची दुरुस्ती करणे, माझे तिकीट (My Stamp), इंडीया पोस्ट पेमेंट्स बँक ( IPPB) चे नवीन खाते सुरु करण्याबाबतची सेवा देण्यात येणार आहे. तसेच सुकन्या समृध्दी योजना, टपाल विमा योजना व इतर योजनेची माहिती दिली जाणार आहे. आधार कार्ड नोंदणी व दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत असे, पंढरपूर डाकघर विभागाचे अधिक्षक एन रमेश यांनी सांगितले.
या आधार शिबीराचा जास्तीत-जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पंढरपूर डाकघर विभागाचे अधिक्षक एन रमेश यांनी केले आहे.





0 Comments