पंढरपूर-येथील श्री विठ्ठल एज्युकेशन संचलित,लोटस इंग्लिश स्कूल कासेगाव, याठिकाणी तालुका विधी सेवा समिती व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर संपन्न झाले.
कायदेविषयक शिबिराचे प्रमुख पाहुणे पंढरपुरच्या दिवाणी न्यायालयाचे (कनिष्ठ स्तर)न्यायाधीश ए.पी. कराड हे होते. यावेळी लोटस इंग्लिश स्कूलचे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी न्यायमूर्ती कराड यांचे स्वागत केले. तसेच पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.बी. व्ही.मुळे, उपाध्यक्ष ॲड. विलास शेळके व ॲड. संदीप सुरवसे यांचे देखील स्वागत केले. त्यावेळी ते म्हणाले की ‘या कासेगावच्या माळरानावर रोंगे सरांनी हसती खेळती फुले उमलवली आहेत’ तर कायदेविषयक मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते विलास शेळके म्हणाले की, ‘मुलांच्या किंवा मुलींच्या संरक्षणासाठी २२ मे २०१२ रोजी संसदमध्ये कायदा पास झाला आणि याची अंमलबजावणी १२ नोव्हेंबर २०१२ रोजी झाली. प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड फ्रॉम सेक्सउल ऑफएसन्स (पोक्षो) कायदा असून ४ वर्ष ते १८ वर्षातील मुला-मुलींसाठी कायदा असून गुड टच, बॅड टच याची माहिती दिली. ज्या पीडित मुलीवर किंवा मुलावर अन्याय झाला आहे, अशा पीडित मुलांना व मुलींना न्याय देण्यासाठी विशेष प्रोटेक्शन ऑफिसर नेमून तो गुन्ह्याची नोंद करून घेतो आणि गुन्हेगार व्यक्तीपासून पीडित व्यक्तीला संरक्षण देतो अशी माहिती दिली.
पुढे अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती कराड म्हणाले की, ’उच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे समाजातील एक घटक म्हणून कोर्टातचं फक्त काम न करता समाजात कायद्याची माहिती देणे गरजेचे आहे. तसेच बालमजुरी किंवा बाल लैंगिक अत्याचार शिक्षणापासून वंचित असणारी मुले, भीक मागायला लावणे, अनाथ मुलांना त्रास देणे, असे अनेक प्रकाराने अत्याचार होत असतील तर त्याची तक्रार पोलीस स्टेशन पासून थेट कोर्टापर्यंत करता येते. शिक्षणाने क्रांती आणि उत्क्रांती झाली आहे. शिक्षणामुळे माणूस मोठा होतो. त्यामुळे सर्वांनी शिक्षण घेणे खूप गरजेचे आहे.’ असे न्यायमूर्ती ए.पी. कराड म्हणाले. प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण म्हणाल्या की,’आम्ही शाळेत सायकॉलॉजिकल कौन्सलर मार्फत मुलींना गूड टच आणि बॅड टच या संबंधी माहिती देतो, तसेच समाजात असे घृणास्पद प्रकार होऊ नयेत म्हणून आम्ही शाळेत व्हॅल्यू एज्युकेशन या विषय मार्फत चांगले काय वाईट काय याची माहिती सांगतो. कायदेविषयक कोणताही कार्यक्रम राबवायचा असेल तर शाळा नेहमी तयार आहे असेही त्या म्हणाल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिक्षक संपत लवटे,पटेल नामदे, ढोणे, गाढवे, निकम, वायदंडे, अस्मा शेख, साळुंखे, दिवसे, दीक्षित, कोकणे, घोलप आदी उपस्थित होते. ॲड. संदीप सुरवसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.





0 Comments