पंढरपूर (प्रतिनिधी) भारतातील अद्विक हायटेक प्रायव्हेट लिमिटेड हि एक अग्रगण्य कंपनी असून जागतिक ऑटोमोटिव्ह घटक उत्पादन करीत असून गेल्या बारा वर्षांपासून दुचाकी, स्थिर इंजिन आणि ट्रान्समिशन सिस्टम सेगमेंट मध्ये कार्यरत आहे. अशा या कंपनीत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील १० विद्यार्थ्यांचीकॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली असल्याची माहिती ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे यांनी दिली.
ग्राहकांच्या डिझाइनसाठी, त्यांच्या गरजा आणि विशिष्टता लक्षात घेऊन जागतिक बाजारपेठेत उत्कृष्टतेच्या क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन आणि विकास केंद्र हे अभियांत्रिकीसाठी सेल्युलर उत्पादन सेट अप नवीन तंत्रज्ञानासह सर्वात प्रगत मशीन्स जागतिक दर्जाचे देण्यासाठी अद्विक हायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जगात नामांकित आहे. अशा या कंपनीत एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील कोमोदिनी काकडे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील पदमश्री कुलकर्णी तर मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील विनायक गुंडेवाडी, प्रसाद मोरे, वर्षा पाटील, प्रशांत भिंगारे, दिव्या कुलकर्णी, गणेश माने, वृषाली पाटील, रागिणी पवार आदी विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे मधून निवड करण्यात आली आहे.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये विद्यार्थ्याचे कौशल पाहून शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी पंढरपूर सिंहगड मध्येच असल्याने आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित कंपनीत, सरकारी नोकरी तसेच काही जण स्वतःचा व्यवसाय उभा करून लाखों रुपये मिळवीत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील इंजि. सुरज सुनील डोके यांनी स्वतः स्पार्टन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन करून रोजगार निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय करण्याचे प्रशिक्षण महाविद्यालयात दिले जाते. विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी गुणवत्ता पुंर्ण शिक्षण देण्यासाठी पंढरपूर सिंहगड नेहमीच सर्वात पुढे असून पालकांच्या व विद्यार्थ्याच्या विश्वासास पात्र ठरत आहे.
अद्विक हायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. भारत आद्मिले, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. सुर्यकांत पाटील आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.





0 Comments