विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करण्यासाठी उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पहावी - अण्णासाहेब कोरके


भोसे : प्रतिनिधी, दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आत्ताच आपले ध्येय काय आहे हे ठरवून त्यानुसार अभ्यास करावा आणि लक्ष्य साध्य करण्यासाठी उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पहावीत असे आवाहन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अण्णासाहेब कोरके यांनी केले.
भोसे (ता. पंढरपूर) येथे ज्ञानज्योत कोचिंग क्लासच्या दहावी उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सारिका गावंधरे होत्या. यावेळी संजय कोरके, नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब पवार, अरुण गायकवाड उपस्थित होते. अण्णासाहेब कोरके म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना सर्वप्रथम आपल्याला काय व्हायचे आहे हे ठरवून आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. निश्चित केलेले ध्येय साध्य करण्यासाठी उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहिले पाहिजे. परिस्थिती ही तुमच्या यशाची किंवा अपयशाला कारण ठरू शकत नाही, परिस्थिती कशी ही असली तरी तुमच्यात जिद्द, चिकाटी, आत्मियता असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट निश्चितपणे साध्य करू शकाल. आयुष्यात टप्याटप्प्यावर भेटणारा सल्लागार खूप महत्वाचा असतो तसेच पालकांनी आपली इच्छा मुलांवर लादली नाही पाहिजे, मुलांचा कल कसा आहे हे पाहून त्यादृष्टीने त्यांना वाव द्यायला हवा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


यावेळी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या ज्ञानज्योत कोचिंग क्लासच्या शितल अनिल गावंधरे (92.40 %), सायली प्रदिप पाटील (89.20%), मैथाली अनिल क्षिरसागर (84.40 %), धनश्री संतोष टरले (84 %), भक्ती सुधीर व्यवहारे (83.40%), पृथ्वीराज गजानन सुतार (82.80%), मंगेश विकास येलपले (82.80%), प्रमोद दत्तात्रेय हांडे (82.40%), आरती पांडुरंग लोखंडे (82%), प्रवीण राजाराम म्हेत्रे (82%), आकांक्षा अनिल कोरके (81.60%), हर्षदा मधुकर बारले (81.40%), मानसी संजय कोरके (80.40%), आर्यन जयवंत बेलदार (79.40%), कुणाल देशमुख (79.80%) आणि अजिंक्य वसंत देवकर (79%) या विध्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संजय कोरके, सारिका गावंधरे यांनीही आपल्या मनोगतात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विनायक तळेकर, हनुमंत माळी, कैलास कोरके यांच्यासह माता पालक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानज्योत कोचिंग क्लासचे संचालक बी. ए. गोलांडे यांनी केले. सूत्रसंचालन विशाल आमराळे यांनी केले. आभार दत्तात्रय टरले यांनी मानले.







-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments