स्वेरी कॉलेजमध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेवर आज ऑनलाईन समुपदेशन

 
तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार
पंढरपूर- ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे वतीने संपूर्ण राज्यभर एकाच वेळी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश घेता येणाऱ्या डिप्लोमा इंजिनियनरींग प्रवेशासंदर्भात आज बुधवार दि. १२ जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ऑनलाईन समुपदेशन केले जाणार आहे. उद्योग जगतामध्ये असलेले तंत्रशिक्षणाचे महत्व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहचावे या उद्देशाने एम.एस.बी.टी.ई.ने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे.’अशी माहिती प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली.  

स्पर्धेच्या युगात मिळणारी माहिती ही अचूकच मिळेल हे सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण होतो हे टाळण्यासाठी व अचूक माहितीसाठी उद्योग जगतातील तज्ञ व्यक्तींकडून डिप्लोमानंतर असणाऱ्या करिअरच्या वाटा व व्यवसायाद्वारे उपलब्ध होणाऱ्या संधीची माहिती या ऑनलाईन समुपदेशनाद्वारे विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली डिप्लोमाचे प्राध्यापक वर्ग याची जय्यत तयारी स्वेरी कॉलेजमध्ये असलेल्या वातानुकूलित आंतरराष्ट्रीय  कॉन्फरन्स हॉलमध्ये करत आहेत. या समुपदेशनाचा लाभ दहावीबारावी व आयटीआय नंतर डिप्लोमा अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ व डॉ. विनोद मोहितकर तसेच अभियांत्रिकीच्या विविध शाखांमधील तज्ञ मार्गदर्शक हे विद्यार्थ्यांशी व पालकांशी सवांद साधून त्यांच्या शंकाचे निरसन करणार आहेत. आज (बुधवार, दि. १२ जून ) सकाळी १० ते १२ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून. राज्यातील सर्व शासकीय व खासगी (अशासकीय) तंत्रनिकेतन कॉलेजमधून याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी स्वेरी कॉलेजमध्ये येऊन या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवावी.     






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments