पंढरपूर सिंहगडमध्ये पायथाॅन या विषयावर कार्यशाळा


पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता.पंढरपूर ) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात पायथाॅन या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली ही कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
     गेल्या आठ वर्षापासून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आय.आय. टी. बाॅम्बेचे रिमोट सेंटर असुन या रिमोट सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व प्राध्यापकांच्या ज्ञानासाठी विविध कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात. यामध्ये पायथाॅन लॅग्वेज व इमेज प्रोसेसीव्ह, मशीन लर्निंग, डिप लर्निंग, सायबर सिक्युरेटी या सर्व क्षेत्रामध्ये सध्या वापरली जात आहे. हि लॅग्वेज शिकण्यास सोपी असुन अद्यावत आहे. याची सर्व माहिती उपलब्ध असुन याचे सॉफ्टवेअर सर्वञ उपलब्ध आहे. येणाऱ्या काळामध्ये अभियांत्रिकी शिक्षणामध्ये या सॉफ्टवेअरचा सर्वाधिक वापर होणार आहे. प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना आय. आय. टी. बाॅम्बे कडून मार्गदर्शन करण्यात आले.
     या कार्यशाळेत संगणक विभागातीलसर्व शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेचे समन्वयक संगणक विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत आणि प्रा. बालाजी कोरे यांनी काम पाहिले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रिमोट सेंटरचे समन्वयक डाॅ. स्वानंद कुलकर्णी, अमोल नवले यांनी काम पाहिले.






-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments