ग्रामस्थांसह वाहनधारकांमधून नाराजी
पंढरपूर,प्रतिनिधी : देवभुमी पंढरीनगरीला जोडणार्‍या सर्वच रस्त्यांचे नुतनीकरण होवून रस्ते आता सिमेंट कॉक्रीटचे होत आहेत.परंतु यातील बहुतांश रस्त्यांची कामे संथगतीने सुरु असल्यामुळे ग्रामस्थांसह वाहनधारकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.उपरी(ता.पंढरपूर)या परीसरात अनेक ठिकाणी अपुर्ण असलेल्या रस्त्याच्या कामामुळे धुळपुर म्हणून गावाची नवीन ओळख तयार होत आहे.
पंढरपूर-म्हसवड व पंढरपूर-कराड या रस्त्याचे काम रोडवश शोल्यूशन या कंपनीकडे आहे.सुरुवातील वेगाणे कामे करुन इतर रस्त्यांची कामे आपल्या पदरात पाडून घेण्यात कंपनी तरबेज झाली आहे.कारण जून्या कामाकडे दुलर्क्ष करून काही दिवस नवीन काम केले जाते.असाच प्रकार पंढरपूर-सातारा या रोडवर घडलेला आहे.वाखरी पासून ते पुढे भाळवणी पर्यत अनेक ठिकाणी लहाणपुलांमुळे रस्त्याचे काम अपुूर्ण आहे.परंतु ज्या ज्या ठिकाणी कामे अपुर्ण आहेत तेथे पाणी न मारल्यामुळे नेहमीच मोठी धुळ उडत असते.यामुळे रस्त्याच्या आजूबाजूला असणार्‍या घरांचे रंग बदलून गेले असून एका शेतकर्‍याच्या मिरचीच्या प्लॉटर्च लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.धुळीमुळे वाहनचालवतांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपुर्ण कामांच्या ठिकाणी सतत अ पघात  घडत आहेत.मागील काही दिवसांपुर्वी या ठिकाणी पाणी मारले जात होते परंतु कंपनीने पंढरपूर-कराड या रोडकडे सर्व यंत्रणा वळविल्यामुळे उपरी परीसरात अपुर्ण कामांवर बरेच दिवस पाणी मारले गेलेले नाही.त्यामुळे आसपासच्या आसपासच्या ग्रामस्थांमध्ये श्‍वसनाचे आजार होत आहेत.याबाबत वारंवार संबधित कंपनीच्या अधिकार्‍यांना सांगुनही जाणीवपूर्वक त्यांच्याकडून अपूर्ण कामांकडे दुलर्क्ष केले जात असून अपूर्ण कामांबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे अपुर्ण आहेत त्या सर्व ठिकाणी उतार,खोलगट भाग आहे त्यामुळे पावसाळ्याया ठिकाणी पाणी साचून राहणार आहे.त्यामुळे  अपुर्ण कामे त्वरीत पुर्ण करावीत अशी मागणी उपरी,सुपली,पळशी या परीसरातील ग्रामस्थांमधून केली जात असून कंपनीने याची दखल घेतली नाही तर ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.


पंढरपूर ते वाखरी पर्यत प्रवास करतांना अक्षरश; तारेवरची कसरत करावी लागत आहे.अपुर्ण कामांमुळे धुळीचा मोठा त्रास होत असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे.प्रशासनाने त्वरीत लक्ष देवून अपुर्ण कामे पुर्ण करुन घ्यावीत अन्यथा पावसाळ्यात सर्वांनाच मोठ्या मरणयातना सहन कराव्या लागतील-बाळासाहेब यलमार,प्रोप्रा बिवाय अ‍ॅग्रो 





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com