कोर्टी, पंढरपूर: सिंहगड पब्लिक स्कूल मध्ये सीबीएसई बोर्ड कडून नुकताच जाहीर करण्यात आलेल्या निकालात शाळेतील 10वी व 12वी च्या विध्यार्थ्यानी नेत्रदीपक यश प्राप्त केले. या निमित्ताने शाळा प्रशासन कडून या निकालात विशेष प्राविण्यासह मेरीट आलेल्या विध्यार्थ्यांचा सम्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न
झाला. या वेळी विध्यार्थ्याना मंचावर उपस्थित शाळेच्या प्राचार्या सौ. स्मिता नवले, मुख्याध्यापिका सौ. स्मिता नायर, समन्वयक सौ. नम्रता बिदारी यांच्या बरोबर प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर बसण्याचा मान मिळाला. त्यात प्रामुख्याने इयत्ता 12 वी मधील शाळेतून प्रथम आलेली कु. शिवज्योती भांगे द्वितीय आलेली कु. मृणाल भोसले व तृतीय असलेली कु. आसावरी बोक्षे त्याच प्रमाणे 10 वी मधून शाळेतून प्रथम आलेली कु. प्राची खडतरे द्वितीय आलेली कु. ऊर्जा दोशी व तृतीय आलेला शार्दुल केदार या विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन करून विशेष प्रावीण्य प्राप्त केले. सन्मानित विध्यार्थ्याना प्रशस्तीपत्रक तसेच सम्मान चिन्ह देऊन गौरन्वित करण्यात आले.
विध्यार्थ्यानी शाळेवर आणि शाळेच्या शिक्षकांवर विश्वास ठेऊन अभ्यासाचे योग्य नियोजन, रोजचा अभ्यास करण्याचे योग्य वेळापत्रक तयार करून लक्ष पूर्वक व प्रामाणिकपने अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते असे मत शाळेच्या प्राचार्या सौ. स्मिता नवले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी यशस्वी विध्यार्थ्यानी देखील आपापले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका सौ. विदया कारंडे यांनी तर आभार प्रदर्शन
श्री. सैफन शेख यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.





0 Comments