पंढरपूर (प्रतिनिधी) आज कालच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसांना वेगवेगळे आजार होत आहेत या आजाराचे निदान होण्यासाठी प्रथम वैद्यकीय तपासणी म्हणजेच रक्तगट तपासणी केली जाते वास्तविक पाहता प्रयोगशाळेत रक्त तपासण्यासाठी जाणे काही नागरिकांना शक्य नसते यामुळे नागरिकांच्या रक्तातील साखर मोजणे व रक्तगट माहिती असणं खुप महत्वाचे असते. अशीच कल्पना कोर्टी तालुका पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना सुचलेली कल्पना त्यांनी यंत्र बनवून प्रत्यक्षात उतरवली आहे.
माणसाचा रक्तगट आणि रक्तातील साखर मोजण्याचे यंत्र सिंहगड महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील कुमुदिनी काकडे, सीमा होमकर, हर्षाली क्षीरसागर, आयेशा शेख यांनी प्रोजेक्ट तयार केला असुन प्रोजेक्ट तयार करण्यासाठी प्रा. सुमित राशिनकर यांचे मार्गदर्शन लाभले. हे यंञ रक्तगट तपासण्यासाठी व रक्तातील साखर मोजण्याचे काम करते. ग्रामीण भागातील रुग्णांना प्रयोगशाळेत जाऊन रक्तगट आणि रक्तातील साखर प्रमाण तपासावे लागते, अशावेळी रुग्णांचा वेळ वाया जातो, परिणामी रूग्णांना ञास सहन करावा लागतो. प्रयोगशाळेत गर्दी असेल तर त्यामध्ये तासंतास नागरिकांना, रुग्णांना थांबावे लागते, मात्र पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी कल्पना वापरून एक नवीन यंत्र तयार केले आहे की ते यंञ वापरू रूग्ण रक्ताची चाचणी लगेच करू शकेल.
आरोग्याच्या दृष्टीने रक्तातील साखरेचे प्रमाण तपासायचे असेल तर रुग्णांना रक्त देणं गरजेचं असतं पण या यंत्रामध्ये फक्त फुकण्याणे साखरेचे प्रमाण तपासले जाते. म्हणजेच रुग्णांना आता प्रत्येक वेळी रक्त काढण्याची गरज नाही. त्यासाठी सुखकर आणि सोयीस्कर अशी नवीन संकल्पना सिंहगड विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून प्रकल्प तयार केला आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या प्रकल्पाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.





0 Comments