कासेगांवच्या बी.सी.ए. व बी.एस्सी महाविद्यालयाचे विद्यापीठात यश




पंढरपूर- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा अंतर्गत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बी.सी.ए. व बी.एस्सी.(ई.सी.एस.) परीक्षेत डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री. विठ्ठल इन्स्टिटयूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेन संचलितइन्स्टिटयूट ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज्,कासेगांवपंढरपूर या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली.
        

पंढरपूरच्या विठठ्लाच्या पावननगरीत अग्रगण्य असलेल्या इन्स्टिटयूट ऑफ कॉम्प्युटर अॅन्ड मॅनेजमेंट स्टडीज्या महाविद्यालयात आजपर्यंत अनेकविद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रत्येक वर्षी अव्वल येण्याचा मान मिळवला व हीच परंपरा कायम राखत यंदाच्या वर्षीदेखील मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बी. सी. ए. परीक्षेत विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीची चमक दाखवली. बी. सी. ए. भाग-३ ची कु. अश्विनी गवळी ही ८३.३१ टक्के गुण मिळवत विद्यापीठात द्वितीय आली तर  बी. सी. ए. भाग- चीच कु. स्वप्नाली एकमल्ली  हीने ८२.०३  टक्के गुण मिळवून विद्यापीठात तृतीय येण्याचा पराक्रम केला.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ.ए. एन. उपासे यांनी दिली. महाविद्यालयात घेण्यात आलेल्या प्रॅक्टीस सेअभ्यासक्रमाचे रिव्हीजनसराव परीक्षाविद्यार्थी विकास कार्यक्रम आदी उपक्रमांमुळे यंदाही महाविद्यालयाने उत्कृष्ठ  निकालाची परंपरा कायम राखली. अशीच परंपरा कायम राहील असे आश्वासन कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री चव्हाण यांनी दिले.यावेळीविध्यार्थ्यांच्या शाबदद्ल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगेअध्यक्ष बी. डी. रोंगेउपाध्यक्ष एच. एम. बागलविश्वस्त दादासाहेब रोंगे तसेच विभागप्रमुख प्रा. समीर मुलाणीबी. सी. ए. भाग- च्या वर्गशिक्षिका श्रीमती.स्नेहल भोसले,  बी.एस्सी. (ई.सी.एस.)- चे वर्ग शिक्षक जगन्नाथ अर्जून, अन्य प्राध्यापकांनी व सर्व पालकांनी अभिनंदन केले.



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments