नवनवीन संशोधनास विद्यार्थ्यांना मिळणार प्रेरणा: प्राचार्य कैलाश करांडे ची माहिती
पंढरपूर (प्रतिनिधी) सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयाला डी.बी.टी. प्रकाश लॅब फोल्डस्कोप या प्रोजेक्टला भारत सरकारचा ८.०० लाखांचा निधी मागील वर्षी मिळाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात फोल्डस्कोप या प्रोजेक्ट अंतर्गत कॉम्पोझिट मटेरियलचे मायक्रोस्ट्रक्चरची पाहणी व नवीन निर्मिती या अंतर्गत काम वाढण्यासाठी निधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिला असल्याची माहिती प्रोजेक्टचे मुख्य संशोधक डॉ. स्वानंद कुलकर्णी व जेआरएफ विजय वैशंपायन यांनी दिली. कॉम्पोझिट मटेरियल हि काळाची गरज लक्षात घेऊन अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राची माहिती होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने काही नवीन प्रकल्प तयार करण्यासाठी हॉट प्रेस मशीन उपयुक्त आहे.
हॉट प्रेस मशीन वर पॉलिमर, रबर, सॉफ्ट मेटल, इत्यादीचे कॉम्पोझिट मटेरियल तयार करण्यात येतात. याचा उपयोग औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो. हे उपकरण डी.बी.टी. प्रकाश लॅब फोल्डस्कोप रीसर्च ग्रांट अंतर्गत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाला मिळाले असून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर याचा फायदा घेत आहेत.
या मशीन च्या साहाय्याने डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी इ-वेस्ट मटेरियल चा पुनर्वापर करून त्याचा प्लास्टिक मध्ये कसा वापर करतात. हा नाविन्यपूर्ण प्रकल्प तयार केला. हॉट प्रेस मशीन वर ५० टन इतका भार देता येत असून त्यावर ३५०० सेल्सिअस इतके तापमान देण्यात येऊ शकते.याचा फायदा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. यामुळे भविष्यात पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविदयालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन करण्यास प्रेरणा मिळणार आहे.





0 Comments