पंढरपूर: दि. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची पीएच. डी.
पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी “ इम्पॅक्ट ऑफ अॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीज इन सोसिओ इकोनॉमिक चेंज ऑफ रुरल एरिया इन सोलापूर डीस्ट्रीक्ट” या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना या संशोधनासाठी डी. ए.
व्ही. वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूरचे डॉ. एस. व्ही. शिंदे यांनी मार्गदर्शन केले. पीएच. डी. च्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव भोईटे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. एन. एन. तंटक हे महाविद्यालयात वाणिज्य विभाग प्रमुख व उपप्राचार्य म्हणून कार्यरत असून आतंरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकात त्याचे चार शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
तसेच कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. माने, प्रा. ए. एस. चंदनशिवे, कार्यालय अधीक्षक श्री अनंता जाधव, डॉ. एम. के. पांचाळ, डॉ. बी. बी. शितोळे, प्रा. टी. व्ही. अनंतकवळस, प्रा. एस. एस. शिवशरण, प्रा. कु. ए. जी. नदाफ तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर सेवक विद्यार्थी व इतर मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.





0 Comments