पंढरपूर नगरपरिषद व पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीच्यावतीने पंढरपूर शहरातील संतपेठ भागातील विविध विकास कामांचा भुमीपुजन समारंभ आमदार प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष लतिका डोके, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, स्थायी समिती सदस्य वामन बंदपट्टे, बांधकाम समिती सभापती सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा समिती सभापती रेहाना बोहरी, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, नगर अभियंता दिनेश शास्त्री, अभियंता नेताजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रभाग क्र.९ मधील इंदिरा गांधी भाजी मार्केट ते गजानन महाराज मठ रस्ता डांबरीकरण-खडीकरण करणे र.रु.९ लाख, लक्ष्मी नगर झोपडपट्टीत कॉंक्रीट करुन पेव्हिंग ब्लॉक टाकणेचे ५० लाख कामाचा शुभारंभ उपनगराध्यक्ष लतिका डोके यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रभाग क्र.१६ व १७ विस्थापित नगर र.रु.७१ लाख, व भगवान नगर येथील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणेचे काम र.रु.३३ लाख, महापुर चाळ झोपडपट्टीत कॉंक्रीट करुन पेव्हिंग ब्लॉक टाकणेचे र.रु.६१ लाख कामाचा शुभारंभ स्थायी समिती सदस्य वामन बंदपट्टे, नगरसेविका मालन देवमारे, रेणुका घोडके, नगरसेवक विवेक परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
प्रभाग क्र.७ व ८ शाळा नं.७ ते भाई भाई चौक त सफाई कामगार वसाहत व भाई भाई चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहा पर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणेचे काम र.रु.४५ लाख, आंबेडकर नगर येथील दलित वस्तीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कॉंक्रीट करुन पेव्हिंग ब्लॉक टाकणेचे र.रु.४७ लाख कामाचा शुभारंभ बांधकाम समिती सभापती सुजितकुमार सर्वगोड, पाणीपुरवठा समिती सभापती रेहाना बोहरी, नगरसेवक संजय निंबाळकर, नगरसेविका रुक्मिणी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगरसेविका सुजाता बडवे, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, मालोजी शेंबडे, आदित्य फत्तेपुरकर, डी.राज. सर्वगोड, नरसिंह शिंगण, सामाजिक कार्यकर्ते अमोल डोके, धर्मराज घोडके, नवनाथ रानगट, बसवेश्वर देवमारे तसेच या भागातील नागरिक हे उपस्थित होते.




0 Comments