स्वेरीचे विश्वस्त उपअभियंता अशोक भोसले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त स्वेरीत सत्कार
पंढरपूर-(संतोष हलकुडे) ‘ज्यांचे काम पारदर्शी असते त्यांच्या कार्याची एक स्वतंत्रपणे चर्चा होत असते. त्यामुळे अनेकांना ते अवघड वाटते आणि अशी पारदर्शी कामे करणारे अधिकारी अत्यंत धाडसी असतात. त्यामुळे जी माणसे धाडसाने कामे करतात त्यांना हमखास यश मिळत असते. त्याचबरोबर ते कोणत्याही दबावाला बळी पडत नसतात. उपअभियंता अशोक भोसले यांच्या पारदर्शी कामामुळे निवृत्ती नंतरदेखील त्यांच्या कार्याचे अनुकरण केले जाणार आहे. कारण प्रशासकीय पातळीवर त्यांच्या कार्याचा स्वतंत्र ठसा अभियंत्याना भविष्यात प्रेरणा देत राहणार आहे.’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षा मंडळाचे माजी अधिकारी व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाचे माजी उपसंचालक डॉ.एन.बी. पासलकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सोलापूर आणि कोल्हापूरच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व स्वेरीचे विश्वस्त अशोक भोसले हे नुकतेच शासकीय सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत.याप्रसंगी श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजिलेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून माजी उपसंचालक डॉ.एन.बी. पासलकर हे अभियंता भोसले यांच्या प्रभावी कार्याचा गौरव करत होते. प्रारंभी डॉ. पासलकर यांच्या हस्ते भोसले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार,सिव्हील विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार आणि संस्थेचे जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी अभियंता अशोक भोसले यांच्या कार्यातून मिळालेलेल्या मार्गदर्शनामुळे ‘कामे कशी करावीत?’ याचेच शिक्षण मिळाले असून त्यांच्या मार्गदर्शनातून सातत्याने नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.’ असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा म्हणाले की, ‘प्रशासकीय पातळीवर भोसले यांच्यातून अभियांत्रिकी मधील सखोल ज्ञान आणि धाडस हे गुण प्रत्येक कामातून दिसून येते. त्यामुळे त्यांच्या अखत्यारीत असलेली कामे अल्पावधीत मार्गी लागली. त्यांच्यामुळे स्वेरीच्या यशाला गती मिळाली. बोर्ड ऑफ गव्हर्नसचे चेअरमन सोरकुटवार म्हणाले की, अभियंता भोसले यांनी कोणत्याही अशक्य गोष्टीला सामोरे जावून धाडसाने निर्णय घेवून कामे पूर्णत्वास नेली.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘स्वेरीच्या अभूतपूर्व यशात अशोक भोसले यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कामाची पद्धत अनुकरणीय असून त्यातून धाडस आणि संखोल माहिती यामुळे त्यांचे नेतृत्व विशेष उठावदार दिसून येते. त्यांच्या कार्यात आत्मविश्वास आणि ज्ञानाचा आधार अधिक असल्याचे दिसून येते. आता त्यांनी निवृत्ती नंतर मोठी कंपनी स्थापन करावी.’ असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना भोसले म्हणाले की, ‘मी शासकीय सेवेत असताना कोणत्याही बंधनात नव्हतो. अवघड कार्य जिद्दीने व तळमळीने करताना राज्यातील महामार्ग असो अथवा पुलाचे बांधकाम असो प्रचंड अभ्यासाने पूर्ण केली आहेत. कामाची ओळख निर्माण करताना औरंगाबाद, बीड सोलापूर आदी ठिकाणी प्रशासकीय सेवा बजावली असून कामे करणाऱ्याला कोणत्याही अडचणी येत नाहीत. हे समजले. अनेक वेळा धाडसाने कामे करावी लागली. सकारात्मक विचारामुळे सतत उर्जा मिळत राहिली.’ असे सांगून तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या तीर्थ क्षेत्र समजले जाणाऱ्या ठिकाणी तसेच पुणे, विजापूर व हैद्राबाद आदी राष्ट्रीय महामार्ग बनविताना उचललेली जबाबदारी पार पाडताना आलेला अनुभव सांगितला. यावेळी कंपन्यामध्ये कन्सल्टंट अॅन्ड ट्रेनर व्हाईस प्रेसिडेंट अतुल मराठे, श्री. नातू, सौ. प्रेमलता रोंगे, सौ. सुनिता भोसले, सौ नाडगौडा, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले तर प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे यांनी आभार मानले.




0 Comments