पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या ५ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे लायविझ स्मार्ट सोलुशन, ग्रीनटीन सोल्यूशन प्रा. लि. आणि स्पीड टेकसर्व या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे यांनी दिली.
एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर स्थापनेच्या पहिल्या वर्षापासूनच शैक्षणिक निकालाच्या बाबतीत विद्यापीठात सर्वोत्तम महाविद्यालयांपैकी एक आहे. शैक्षणिक गुणवत्ता हि प्रत्येक वर्षी वाढत असून प्लेसमेंट च्या बाबतीत महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यावर्षी सुद्धा दर्जेदार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थ्याना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या आहेत. महाविद्यालयात सुसज्ज पायाभूत आणि शैक्षणिक सुविधा तसेच उच्च प्रतीचे तणावमुक्त आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण ही सिंहगड ची ओळख बनलेली आहे.
शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे संस्थेचे ध्येय आहे. या सर्व शक्ती स्थानांचा विचार करून महाविद्यालयाला केवळ ७ वर्षांच्या काळात नॅशनल अॅक्रिडिटेशन अॅड असेसमेन्टं कौन्सिल म्हणजे नॅक समितीने "ए" दर्जाचे मानांकन दिलेले आहे. अशा प्रकारचे मानांकन मिळविणारे सिंहगड पंढरपूर हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील लायविझ स्मार्ट सोलुशन कंपनीत सुनील खारे, गोपाल गायकवाड, ग्रीनटीन सोल्यूशन प्रा. लि. कंपनीत कु. वैष्णवी कुलकर्णी, समीर खिस्ते तर स्पीड टेकसर्व गणेश मिसाळ या विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली आहे.
कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महावि द्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट
ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. शाम कुलकर्णी, डॉ. स्वानंद कुलकर्णी,
डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार,
प्रा. अनिल निकम, प्रा. भारत आदमिले, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा.
अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.




0 Comments