पंढरपूर (प्रतिनिधी):- आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशन च्या वतीने पंढरीत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मर्चंट बँकेचे चेअरमन नागेशकाका भोसले व एमपीएससीत उज्वल यश संपादन केलेेले संदीप रणदिवे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यावेळी चंद्रभागेचे जल, दुध, दही, तुप, मध यांच्या पंचामृताने छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळयाला अभिषेक घालण्यात आला. पुष्पहार अपर्पण करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
आम्ही पंढरपूरकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम, सचिव ओंकार चव्हाण, मार्गदर्शक सतीशअप्पा माने यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. सोहळ्यानंतर एमपीएससी मध्ये उज्जवल यश संपादन केल्याबद्दल संदीप रणदिवे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक वामनतात्या बंदपट्टे, राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, शिवक्रांती संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण, मराठा महासंघाचे शहराध्यक्ष सुमीत शिंदे, गणेश जाधव, आकाश जयवंतराव माने, गणेश थिटे, विठ्ठल भुमकर, काकासाहेब यादव, बालाजी माने, पुंडलीक रोपळकर, चिक्कु थिटे, प्रदीप मस्के, कुणाल गुंड व अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.







0 Comments