पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल आज ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्यात आला.
लोटस इंग्लिश स्कूलच्या भव्य मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योगाचे महत्त्व पटवून देताना लोटस इंग्लिश स्कूलचे प्राचार्या जयश्री चव्हाण म्हणाल्या की, ‘शरीर माध्यम खुलम’,’धर्मसाधनम्’ ही संस्कृती उक्ती अतिशय महत्वाचे आहे.

कोणतेही सत्कार्य साध्य करायचं झालं तर ठणठणीत शरीर असल्याशिवाय त्या कार्याची फलश्रुती समाधान कारक मिळणे शक्य नाही नियमित योगा केल्याने शारीरिक व मानसिक थकवा जाणवत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आरोग्य देखील उत्तम राहते.’ योगा प्रशिक्षक अस्मिता घोलप म्हणाल्या की, ‘योगामुळे आरोग्य सुदृढ होते त्यामुळे योगाची दररोज गरज आहे शरीर स्वास्थ्य आणि मनाच्या एकाग्रतेचे बरोबर मेंदू प्रत्येक अवयवाकडून व्यायाम करून घेतो. यामुळे शुद्ध मनाला अजून बळकटी मिळते मन आणि आरोग्य बळकट असेल तर शरीर सदृढ राहून अंगीकृत कार्याला प्रतिसाद मिळतो यांच्यासमवेत क्रीडा शिक्षक मयूर वागज, अस्मा शेख, सई शिंदे, ईश्वरी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली स्वाईप परिवारातील सर्व सदस्याकडून प्राणायाम करून घेतले योगा नियमित केल्यामुळे शरीराच्या अवयवाचे विकार होत नाहीत हे सांगून योगाचे महत्त्व पटवून दिले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगासनं केल्यामुळे अनेक शिक्षक व विद्यार्थी प्रसन्नतेचा अनुभव घेताना दिसत होते. यावेळी योगामध्ये शिक्षक पटेल, लवटे, वायदंडे, निकम, मुलानी, अर्जुन, गाढवे, ओव्हाळ, दीक्षित, दिवसे, झांबरे, शितल, देवकर,गंभीरे, शिक्षकेत्तर कर्मचारी खपाले, वाघमारे, फडतरे, सर्व शिक्षक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, वर्गशिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी योगामध्ये सहभाग घेतला होता.




0 Comments