पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या सीडमनी अंतर्गत २.०० लाखांचा निधी मिळाला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे यांनी दिली.
या प्रोजेक्ट अंतर्गत साखर कारखान्यातील बगॅस ऍशचा नाविन्यपूर्ण उपयोग करून त्याचा अल्युमिनियम कॉम्पोझिट मटेरियलचे नवीन निर्मिती, मायक्रोस्ट्रक्चरची पाहणीव त्याची वेअर चाचणी या अंतर्गत काम वाढण्यासाठी विद्यापिठाने निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती प्रोजेक्टचे मुख्य संशोधक डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.कॉम्पोझिट मटेरियल हि काळाची गरज असून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राची माहिती होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने काही नवीन प्रकल्प तयारकरण्यासाठी वेअर चाचणी मशीन उपयुक्त आहे.
वेअर चाचणी हि मटेरियलची गुणवत्ता तपासण्यासाठी वापरण्यात येते. मटेरियलची किती प्रमाणात झीज होत आहे हे या चाचणीवरून सिद्ध होते. याचा औद्योगिक क्षेत्रातमोठ्या प्रमाणावर वापर केला जाऊ शकतो. हे वेअर चाचणी घेण्याचे उपकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या सीड मनीअंतर्गत कॉलेजला मिळालेअसून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर याचा फायदा घेत आहेत.
या अंतर्गत प्रा. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साखर कारखान्यातील बगॅस ऍश तसेच नारळ आणि शेंगदाण्याच्या टाकाऊ भागांचा उपयोग करूनअल्युमिनियम मध्ये हा नाविन्यपूर्ण मटेरियल तयार केले आहेत. याचा फायदा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणावर होऊशकतो.






0 Comments