बुधवार दि.५ जुन रोजी फरताळे दिंडी मठ,पंढरपूर येथे महाराष्ट्रात, कर्नाटक आणि तेलंगना(हैद्राबाद) राज्याचा वधुवर परिचय मेळावा पार पडला.
बाथ्री तेली समाजाचे तिनही राज्यातील मुल,मुली त्यांच्या पालकां सहित मोठ्या संख्येने उपस्थीत होते. खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने सदर संमेलन पार पडले. या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व मुला मुलींनी स्वत:चा परिचय स्टेज वर जाउन मराठी, ईंग्रजी व हिंदी भाषेत दिला.नगरसेवक विवेक परदेशी यांनी सुत्रसंचालन करत मुला मुलींना आत्मविश्वास वाढवला व मुला मुलीचा मुलाखत रुपात परिचय करुन दिला.सर्व प्रमुख पाहुन्यांनी मुला मुलींच्या वाढत्या स्टेज डेरिंगचे कौतुक केले व चांगले परिचय देणारे मुलांना बक्षीस देण्यात आले.
बाथ्री तेली समाजाचे अध्यक्ष अमरनाथ परदेशी यांनी सांगितले की वधुवर परिचय संमेलन, सामुहिक विवाह सोहळा हि काळाची गरज असुन सर्व समाज बंधू नी याचा लाभ घ्यावा त्यामुळे आयोजकाचा उत्साह वाढतो या आधी आम्ही ३ वेळा वघुवर परिचय संमेलन व दोन वेळा सामुदायिक विवाह पंढरपूर मध्ये मोठ्या थाटामाटात पार पाडले त्यांनी सांगितले की वेगवेगळ्या गावामध्ये , राज्या मध्ये आपण वधुवर संमेलनाचे आयोजन करुयात ,पंढरपूर चे सदस्य नेहमी मदतीस तत्पर राहतील असे सांगितले.
नगरसेवक शरद तेली यांनी समाज उपयोगी कार्याची स्थुती केली ,दर वर्षी असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन करु असे सांगितले व बाथ्री तेली समाज पंढरपूर चे चांगले नियोजन,सर्व समाज बंधू चे मुक्कामा सहित सर्व सोय सुवीधा आयोजीत केल्या बद्दल आभार मानले ,समाज उपयोगी कार्याला सदैव सहकार्य करु असे सांगितले ,शाहु समाज प्रमुख सुनील शाहु यांनी कार्यक्रमाचे नियोजन छान झाल्याचे सांगुन मुला मुलींना परिचय कसा द्यावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले त्यांचे मनोबल बाढवले.
सदर कार्यक्रमास कोणताही शुल्क आकारण्यात आले नाही, माजी नगरसेवक समाज अध्यक्ष अमरनाथ परदेशी यांनी वडिल स्व.किसनलाल परमानंद परदेशी(रौतल्लै)व आई स्व.रुक्मिणीबाई किसनलाल परदेशी यांच्या स्मरणार्थ कार्मक्रमाचे आयोजन केले.बाथ्री तेली समाज पंढरपूर ने सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष विजय परदेशी, सचीव सुखलाल परदेशी,किसनलाल सुपेकर,बाळासाहेब परदेशी, शंकर परदेशी,संजय परदेशी,सुनील परदेशी, मदन परदेशी,गजेंद्र परदेशी,मा नगरसेवक प्रकाश परदेशी,मा उपनगराध्यक्ष श्रीराम परदेशी,राजु परदेशी यांनी व बाथ्री तेली युवा संघटनां व महिला संघटना यांनी मोलाची मदत केली.







0 Comments