पंढरपूर येथील वाघ सर यांचे युनिक क्लासेसनेे 11 वी व 12 वी सायन्समध्ये दैदिप्यमान यश मिळवले आहे. गेल्या 7 वर्षापासुन या क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी CET/NEET/JEE मध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन युनिक क्लासेसची निकालाची उज्वल परंपरा जोपासली असल्याची माहिती युनिक क्लासेसचे संचालक श्री.वाघ सर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
JEE या परीक्षेमध्ये तब्बल 6 विद्यार्थी उत्तीर्ण, NEET या परीक्षेत 4 विद्यार्थी उत्तीर्ण व CET या परीक्षेत तब्बल 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या वर्षी समाधान कोळी हा विद्यार्थी CET मध्ये 100 पैकी 99.14% (Percentile) गुण मिळवुन उत्तीर्ण झाला आहे. क्लासचे 60 विद्यार्थ्यांच्या बॅचमधुन 32 विद्यार्थ्यांनी 90% (Percentile) पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत. या क्लासेसचे संस्थापक श्री.वाघ सर यांनी विद्यार्थ्यांचा बुध्दयांक ओळखुन एका आगळ्या पध्दतीची शिक्षण पध्दती आपल्या क्लासेसमध्ये निर्माण केली आहे. त्यांचे सहकारी शिक्षक विवेक पवार सर (Chemistry), आदित्य आलाट सर (Physics), गजानन गायकवाड सर (Biology), ओंकार मोहीकर सर (Physics), अनिल पवार सर, (Chemistry) शेख सर (Biology) यांचे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वेळोवेळी बहुमोल मार्गदर्शन लाभले.






0 Comments