कोर्टी:- दिवसेंदिवस तापमानातील होणारी वाढ, पावसाचे घटते प्रमाण, प्रदुषण ,विद्यार्थ्यांमध्ये व लोकांमध्ये वृक्षारोपण आवड निर्माण करणे, एकुणच पृथ्वीचे संवर्धनासाठी एकमेव असलेला उपाय म्हणजे वृक्षारोपण. सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्वपूर्ण असलेला विषय म्हणजेच वृक्षारोपन. यासाठी वन विभाग महाराष्ट्र शासन व सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील गायरान क्षेत्रात 200 वृक्षांची लागवड केली. यावेळी सिंहगड पब्लिक स्कूल मधील इयत्ता आठवीच्या एकुण 200 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावत इतर शाळांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
_________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
यावेळी सामाजिक वनीकरण विभाग कासेगाव च्या वतीने तालुका अधिकारी किशोर अहिरे, ग्रामस्थ म्हणून अशोक यलमार , श्रीधर यलमार, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्व वृक्षांची काळजी सामाजिक वनीकरण विभाग व ड्रिम फाउंडेशन घेणार आहे. या कार्याबद्दल सर्व स्तरातून सामाजिक वनीकरण विभाग , सिंहगड पब्लिक स्कूल व ड्रिम फाउंडेशन चे कौतुक व अभिनंदन होत आहे.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments