पंढरपूर (प्रतिनिधी):- आदिवासी कोळी महादेव जमातीचे 34 जातीचे दाखले मिळाल्यामुळे आषाढी एकादशी दिवशी करण्यात येणारे आंदोलन स्थगीत केले असल्याची माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली. आदिवासी कोळी महादेव जमात आपल्या न्याय्य हक्कासाठी आरपारच्या लढाईला सज्ज झाली असुन श्रीविठ्ठलाची शासकीय महापुजा सुरु असताना कोळी महादेव जमातीचे तरुण आंदोलन करण्याच्या असल्याचे व एकादशी दिवशी पंढरपूरच्या बाहेर जाऊन कड्यावरुन उड्या मारण्याचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता; परंतु नुकतेच आमच्या जमातीच्या 34 जणांना जातीचे दाखले मिळाल्यामुळे हे आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे. परंतु अन्य मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटुन निवेदन देणार असल्याची माहिती गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांचा जातीच्या दाखल्यांसाठीचा लढा चालु आहे. जातीचे दाखले मिळण्यासंदर्भात, आदिवासी कोळी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांना मिळणारी शैक्षणीक शिष्यवृत्ती सुरु करणेबाबत, आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक उभारणेसंदर्भात व चंद्रभागेवरील नियोजीत पुंडलिक सेतु उभारणेचा निर्णय रद्द करणेबाबत शासनाने योग्य ती पावले त्वरीत उचलावीत. जातीचे दाखले द्यावेत यासाठी शासकीय विश्रामगृहात झालेल्या राज्यमंत्री, पालकमंत्री यांच्या बैठकीत झालेल्या ठरावाबाबतचे पुरावे आम्हाला मिळावेत. या बाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येत्या आषाढी एकादशी दिवशी देण्यात येणार आहे.










0 Comments