पंढरपूर-कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपूर संचलित, लोटस इंग्लिश स्कूलने टोपान प्रिंटिंग कंपनी लिमिटेड टोकियो जपान कंपनीशी त्यांच्या यारोकी या शैक्षणिक प्लॅटफॉर्मचा पायलट अभ्यास करण्याबद्दलचा सामंजस्य करार नुकताच केला आहे.
या पायलट स्टडीचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांची गणित विषयाच्या मनांमध्ये असलेली भीती दूर करून सेल्फ लर्निंगद्वारे गणिताची गोडी निर्माण करण्यासाठी होईल तसेच गणित विषयामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी होईल.
शिक्षकांना वर्गात याद्वारे क्लासवर्क आणि होमवर्क देणे शक्य होईल.त्याबरोबरच प्रत्येक मुलाची प्रगती बघणे आणि त्यानुसार त्याला वैयक्तिक सल्ला देणे या निमित्ताने शक्य होणार आहे. शैक्षणिक २०१७-१८ यावर्षी शाळेने फक्त इयत्ता चौथीच्या वर्गासोबत करार केला होता या विद्यार्थ्यांची झालेली प्रगती पाहून यावर्षी शैक्षणिक वर्ष २०१९-२० रोजी इयत्ता तिसरी व चौथी या दोन वर्गासाठी हा सामंजस्य करार केला आहे.
या पायलट स्टडी प्रकल्पासाठी टोपान कंपनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मोफत टॅब आणि यारोकी ॲप्लिकेशन देणार आहेत. या करारामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या करारावर टोपान प्रिंटिंग कंपनी लिमिटेड जपान या कंपनी परदेशातील व्यवसाय प्रमुख औकी कजीरो संस्थेचे सचिव डॉ बी.पी.रोंगे यांच्या स्वाक्षरी आहेत. या करारावेळी यारोकी इंडियाचेमॅनेजिंग डायरेक्टर अनुराग गुप्ता, यारोकी इंडियाचे जनरल मॅनेजर रविकुमार,असोसिएट मॅनेजर अनुपमा नेरुरकर, तसेच संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे व लोटसच्या प्राचार्या डॉ जयश्री चव्हाण व लोटसचे शिक्षक वर्ग उपस्थित होते











0 Comments