● पंढरपूर सिंहगडच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी: पोलीस प्रशासनाकडून कौतुक
पंढरपूर (प्रतिनिधी) दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून लाखो भाविक भक्त आषाढी वारीनिमित्त पंढरपूरात येत आहेत. वारकऱ्यांच्या मदतीसाठी पंढरपूर सिंहगडचे १०० विद्यार्थी पोलिस मित्र म्हणून वारीमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याची माहिती सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पत्रकारांना दिली.
पंढरपूर मध्ये आषाढी वारी निमित्त येणाऱ्या वारकऱ्यांना विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या माहिती केंद्रावर, बाहेरून आलेल्या वाहनांची पार्किंग मध्ये व्यवस्था करून घेण्यासाठी तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना मदत करण्यासाठी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील १०० विद्यार्थी पोलिस मित्र म्हणून सध्या आषाढी वारी मध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत.
विद्यार्थ्यांसमवेत राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख व प्रा. महेश शिंदे हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वारकऱ्यांना मदत करीत आहेत. पोलिस मिञ म्हणून सहभागी झालेले विद्यार्थी हे पोलिस प्रशासनाला दिनांक १० जुलै २०१९ ते १३ जुलै २०१९ या कालावधीत वारीमध्ये पोलीस मित्र म्हणून कार्यरत राहून मदत करणार आहेत. भाविकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पोलीस मित्रांची जबाबदारी महत्वपूर्ण ठरत आहे. पोलीस प्रशासनाला या पोलिस मित्रांची खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असल्याने पोलिस प्रशासनामधुन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील पोलीस मित्रांचे सर्वत्र कौतुक व आभार व्यक्त होत आहेत.











0 Comments