पंढरपूर : “शिक्षण क्षेत्रात अतिशय वेगाने होणारे बदल अंगिकारुन उपेक्षित
वंचित घटकांना न्याय देण्याचे काम आपल्या अधिकारातून प्राचार्य डॉ. अशोक भोईटे
यांनी केले आहे. सामान्य कुटुंबातून येवून शिक्षण क्षेत्रातील उच्च पदे ही भूषविली
मात्र या पदाचा अहंकार त्यांनी कधीही बाळगला नाही. त्यामुळेच प्राचार्य भोईटे हे
शिक्षणक्षेत्रात आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणून सुपरिचित आहेत.” असे प्रतिपादन शिवाजी
विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. अरुण भोसले यांनी
केले.रयत शिक्षण संस्थेच्या
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या
‘एकषष्ठी दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
_______________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
प्रोफेसर डॉ. अरुण भोसले म्हणाले की, “प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी रयत शिक्षण संस्थेत सचिव म्हणून यशस्वी कारकीर्द केली आहे. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी काम केले आहे. अधिकारी म्हणून कार्य करताना त्यांनी आपल्या अधिकाराचा
वापर विद्यार्थी हितासाठी केला आहे. प्रशासनातील एक आदर्श मापदंड म्हणून आपल्या कार्याचा ठसा प्राचार्य भोईटे यांनी उमटविला आहे.”
या कार्यक्रमात प्राध्यापक कल्याण समितीच्या वतीने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
शाल, श्रीफळ, पुष्पहार, फेटा व सन्मानचिन्ह असे सत्काराचे स्वरुप होते.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “शिक्षण क्षेत्रातील अधिकारातून
विद्यार्थ्यांच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी देण्याची संधी मिळते. शिक्षक हा माणसाच्या जीवनातील
महत्वाचा घटक आहे. त्यांनी विद्यार्थी हितासाठी सदोदित कार्यरत असले पाहिजे. रयत शिक्षण संस्थेने मला
खूपच चांगल्या संधी उपलब्ध करुन दिल्याने मी लोकहिताची खूप कामे करु शकलो. याचे श्रेय रयत शिक्षण
संस्थेला जाते. त्यामुळे मी जीवनात कृतार्थ आहे.”
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा. के. पी. गायकवाड यांनी
केले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एन. एन. तंटक, उपप्राचार्य बी. जे. तोडकरी, उपप्राचार्य ए. एस.
चंदनशिवे, प्रा. दत्ता मचाले आदी मान्यवर, सिनिअर, ज्युनिअर व व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सर्व
शिक्षक व शिक्षकेतर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. आर. जी. कवडे यांनी
मानले.
________________________________________________________________________________



0 Comments