पंढरपूर 31 :- सोलापूर जिल्ह्यात फार मोठया प्रमाणात चारा छावण्या सुरू असून चारा छावणी मध्ये जनावरांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात आहे. दुष्काळी भागात जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी आवश्यकतेनुसार जनावरांच्या छावण्या सुरू करा, असे परिपत्रक राज्य सरकारच्या महसूल विभागाने दि.25 जानेवारी 2019 रोजी काढ्ले होते. या परिपत्रकामध्ये जनावरांच्या छावण्या दि.30 जुलै 2019 पर्यंत सुरू राहतील असे परिपत्रक काढले होते.
_________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
मात्र सोलापूर जिल्ह्यात सध्या खुप मोठया दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडुन शेतकर्यांच्या जनावरांना चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध होईपर्यंत चारा छावणीस मुदतवाढ मिळावी अशी मागणी शेतकर्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सहकार, मदत व पुर्नवसन सुभाष देशमुख, सोलापूर जिल्हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचेकडे मागील आठ्वड्याात लेखीपत्राद्बारे चारा छावणीस मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
याबाबत काल महाराष्ट्र् शासनाने चारा छावणीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश जिल्हाधिकारी, सोलापूर यांना दिले असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी दिली. सदर चारा छावणीस मुदतवाढ् मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाट्ील, मंत्री सहकार, मदत व पुर्नवसन सुभाष देशमुख, सोलापूर जिल्हा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे आमदार प्रशांत परिचारक यांनी आभार व्यक्त केले. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व चारा छ्ावणी चालक यांनी याबाबत समाधान व्यक्त करून आमदार प्रशांत परिचारक यांचे आभार मानले.
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments