पंढरपूर -दि.26- पंढरपूर येथील सरगम टॉकीजच्या पुढे रेल्वे कि.मी.नं.427/45 रेल्वे रुळावरती एक अनोळखी व्यक्ती मयत अवस्थेत आढळून आली आहे. सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास संबंधितांनी रेल्वे पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पंढरपूर रेल्वे पोलीसांनी केले आहे.
या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 50 वर्षे असून, अंगाने मध्यम, रंगाने गोरा, चेहरा गोल, अंगात निळसर रंगाची पॅन्ट असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे. तसेच डोके शरीरापासूण वेगळे झालेले आहे,
संबंधितांनी तसेच ओळखीच्या व्यक्तींनी पंढरपूर लोहमार्ग पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





0 Comments