पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये ‘कारगिल विजय’ दिवस साजरा करण्यात आला.
प्रारंभी कारगिल युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. प्रस्तावनेत विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी ‘कारगिल विजय’ दिवसाचे महत्व आणि ‘तो’ दिवस साजरा का केला जातो ? याबाबत माहिती दिली. संस्थेचे विश्वस्त प्रा. सुरज रोंगे म्हणाले की,’वीस वर्षापूर्वी म्हणजे २६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धात मोठा विजय मिळविला. यामुळे या दिवसाचे विशेष महत्व असल्यामुळे आजचा दिवस ‘कारगिल विजय’ म्हणून भारतभर साजरा करतात.’ असे सांगून कारगिल विजयाची सविस्तर माहिती दिली.
यावेळी सेमिनार हॉलमध्ये भव्य पडद्यावर एल.सी.डी प्रोजेक्टरच्या सहाय्याने भारतीय सैन्याने केलेली लक्षवेधी सर्जिकल स्ट्राईकची माहिती ‘उरी’ सिनेमाच्या माध्यमातून दिली गेली. महाराष्ट्र राज्य कृती समितीचे राज्य संघटक समाधान घाडगे यांनी देखील भारतीय सैन्याचे योगदान असलेल्या ‘कारगिल विजय’ दिवस यावर मनोगत व्यक्त केले. यावेळी दर्लिंग विद्यामंदिर चळे मधील शिक्षक वृंद अमर चव्हाण, गोपाळ माळी, मोहन रोंगे, विजय घाडगे, संतोष मोरे, पत्रकार सतीश बागल, तसेच स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख प्रा. करण पाटील, पदवी अभियांत्रिकी प्रवेश अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.







0 Comments