सिंहगड ची जाणीव पुर्वक बदनामी होत असल्याचा कृती समितीचा आक्षेप
सोलापूर (प्रतिनिधी) सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी मध्ये ८५ हजार विद्यार्थी ८ हजार कर्मचारी आणि १०५ कॉलेज असलेल्या सिंहगड संस्थेविषयी सध्या सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांचा गैरसमज दूर व्हावा या उद्देशाने दिनांक २७ जुलै २०१९ रोजी सोलापूर येथील श्रमिक पत्रकार भवन मध्ये सिंह कृती समितीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषद मध्ये बोलतांना सिंहगड कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी सिंहगड संस्थेचे उत्कृष्ट निकाल व दर्जेदार प्लेसमेंट असताना संस्थेचे जाणीवपूर्वक बदनामी होत असल्याचा आक्षेप घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात साविञीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे पंढरपूर व सोलापूर येथील सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जाते. या शैक्षणिक संस्थेविषयी विद्यार्थी व पालकांना जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन प्रवेशापासून रोखले जाते. सिंहगड संस्थेची प्रगती अल्पावधीत झालेली काही संस्थांना पाहवत नसल्याने जाणीवपूर्वक सुड बुद्धीने शक्य असलेल्या मार्गाने संस्थेविषयी खोटी अफवा पसरत आहेत. गरजू विद्यार्थ्यांना व पालकांना याविषयी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात डायरेक्टर पासून शिपायापर्यंत शासकीय नियमाप्रमाणे सहावा वेतन आयोगानुसार वेतन देणारी एकमेव सिंहगड संस्था आहे. महिला भगिनींना सहा महिन्यांपूर्वीची प्रस्तुती रजा टी.ए.डी.ए. पीएफ सारख्या सुविधाही दिल्या जातात.
उत्कृष्ट निकाल आणि चांगल्या प्रकारे नामांकित व बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये प्लेसमेंट देणार्या सिंहगड संस्थेचा आज नावलौकिक वाढत आहे. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी काही जणांकडून होत असलेल्या बदनामी साठी सिंहगड संस्थेने गुन्हे दाखल केले आहेत. जर कोणी सिंहगड संस्थेची विद्यार्थी व पालकांनी चुकीची माहिती देत असेल तर अशा अफवांवर विद्यार्थी व पालकांनी विश्वास ठेऊन नये असे आवाहन सिंहगड टेक्निकल एज्युकेशनल सोसायटी अधिकृत सिंहगड कृती समिती च्या वतीने करण्यात आले आहे.






0 Comments