कारगिल युद्धातील जवानांना कामटे संघटनेतर्फे आदरांजली .
सांगोला -सांगोला येथील शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने कारगिल विजय दिनानिमित्त शहिदांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली .सुरुवातीस स्टेशन रोड येथील तोरणा कार्यालयात शहीद अशोक कामटे व शहिदांच्या प्रतिमेचे पूजन अच्युतराव फुले यांनी पुष्पहार अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली .यावेळी बोलताना संस्थापक नीलकंठ शिंदे सर यांनी कारगिल युद्धातील जवानांनी केलेले कार्य खरोखरच अविस्मरणीय असल्याचे सांगितले .
त्याचबरोबर त्यावेळी शहीद झालेले जवान त्यांची कामगिरीमुळेच २० वर्षांपूर्वी कारगिल विजय मिळविता आला .खरोखरच त्यांच्या कार्याला सलाम ,त्यांचे बलिदानामुळेच आज आपला देश सुरक्षित असल्याचे मत शिंदे सर यांनी यावेळी व्यक्त केले .यावेळी संघटनेच्या सर्व सदस्यानी कारगिल युद्धातील जवानांना २ मिनिटे स्तभ मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड हर्षवर्धन चव्हाण यांनी केले .संघटनेच्यावतीने भारत माता कि जय ,शहीद जवान अमर रहेच्या घोषणा देण्यात आले .कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली .





0 Comments