‘खड्डे, चिखल आणि घाणीचं साम्राज्य’: पंढरीतील बसस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरचं लाजिरवाणं चित्रं


राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करत भुवैकुंठ पंढरी नगरीतील बसस्थानकावर उतरल्या बरोबर प्रवाशांच्या नाकात कुबट दर्प शिरतो आणि पायाखाली खडड्डे आणि चिखलांच्या व घाणीच्या साम्राज्यातील प्लॅटफॉर्म दर्शन देतो. जेंव्हापासुन पंढरीतील नवीन बसस्थानक झालेय तेंव्हापासुन येथील प्लॅटफॉर्म च्या दुरुस्तीसंदर्भात अनेक सामाजिक संघटना व ग्राहक पंचायतीनेही आवाज उठवला होता. नुकत्याच या प्लॅटफॉर्मचे निरीक्षण होत असल्याचे फोटो आणि काँक्रीटीकरणाचे काम लवकरच सुरु होणार असल्याच्या बातम्याही येऊन गेल्या परंतु ऐन पावसाळाच्या तोंडावर येथील काँक्रीटीकरण सुरु होणार असल्याच्या प्रशासकीय घोषणेमधील सत्यता काय? हे पुरते उलगडलेले नाही. 

त्यामुळे सद्यस्थितीत तरी पंढरपूरच्या या बसस्थानकावरील प्लॅटफॉर्मवरुन चालताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेजारी सुलभ शौचालयाची भली मोठी इमारत असुनही अनेक प्रवाशी प्लॅटफॉर्मसमोरच्या मोकळ्या जागेत उघड्यावरच लघुशंका करताना आढळतात. यामुळे बसस्थानक परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते.
सोशल मिडीयावर बसस्थानकावरील प्रवाशांचे होणारे हाल दर्शविणारे फोटो व्हायरल होत आहेत.  ‘‘हे बघा चिखल मातीने बरबटलेले घाणेरडे बसस्थानक!’’ ‘‘बघा सोलापुरला दोन आमदार असून किती चांगले बस स्थानक आहे. आणि आमच्या पंढरपूरला 7 आमदार आहेत. खरच किती नशीबवान आहोत आपण’’  अशा प्रकाराच्या उपरोधीक पोष्ट नेटीझन्सनी सोशल मिडीयावर शेअर केेलेल्या आहेत. यावरुनच पंढरीतील बसस्थानकावरील या दुरावस्थेमुळे व गैरसोयीमुळे प्रवासी किती त्रस्त झाले आहेत हे दिसुन येते. प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेतली जाणं गरजेचं असताना यासंदर्भात कोणतेच राजकीय नेते मंडळी कांही बोलायला तयार होत नाहीत. आता पंढरपूर बसस्थानकावरील हा प्रश्‍न सुटतोय की संपुर्ण पुन्हा हा पावसाळा सुध्दा प्रवाशांसाठी तारेवरची कसरत करणाराच जातोय. हे सारं रामभरोसेच.
_____________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


________________________________________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

________________________________________________________________________________


________________________________________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments