लोटस इंग्लिश स्कूलला निर्भया पथकाची भेट
पंढरपूर– ‘निर्भया पथकाची स्थापना सन २०१२ रोजी कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महासंचालक डॉ. विश्वास नांगरे पाटील यांनी केली असून यामध्ये कलम ३५४(ड) अंतर्गत ६०,६५,६६,६७, मुलींचा पाठलाग करणे, जमाव करून मुलींची चेष्टा करणे हा फार मोठा गुन्हा आहे. यासाठी जबाबदार असणाऱ्या संपूर्ण जमावावर कारवाई होऊ शकते. या निर्भया पथकाची १५० हुन अधिक ठिकाणे कार्यरत असून विशेषतः महाविद्यालय परिसर, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, शहरातील मोठमोठे मॉल, सार्वजनिक ठिकाणे, सांस्कृतिक ठिकाणे, बाग-बगीचे, गजबजलेले परिसर अशा विविध ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी वेषांतर करून विद्यार्थिनी व तरुणींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोंवर, मुलांवर कारवाई करू शकतात. यामध्ये तो संशयित आरोपी दोषी आढळल्यास कमीत कमी ३ वर्ष शिक्षा आणि ३ लाख रुपये दंड आणि जास्तीत जास्त ५ वर्षे शिक्षा व ५ लाख रुपये दंड होऊ शकतो. अशी तरतूद केली आहे. जर कुठे अज्ञात ठिकाणी रोडरोमियोंकडून, किंवा गुंडांकडून छेडछाड किंवा त्रास होत असेल तर त्वरीत मला (मोबा.नंबर– ८३०८८२३९९०) फोन करा.’ असे खणखणीत इशारा पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आणि निर्भया पथकाचे प्रमुख गजानन गजभारे यांनी दिला.
________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
कासेगाव (ता. पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल मध्ये पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व निर्भया पथकाचे प्रमुख गजानन गजभारे व त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी भेट देवून निर्भया पथकाच्या ठोस मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. प्रारंभी लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण यांनी पोउनि. गजभारे व सोबत आलेल्या निर्भया पथकातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस कॉ.आलदार, पोलीस शिपाई शिंदे, पोलीस शिपाई क्षिरसागर, महिला पोलीस शिपाई कुट्टे, महिला पोलीस शिपाई निमगरे हे देखील उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस उपनिरीक्षक गजभारे म्हणाले की, ‘त्रास देणारा व्यक्ती कोणता गुंड आहे, कोण पुढारी आहे ?पुढे काय होईल ? हे काहीही न पाहता थेट त्याचावर कारवाई करू शकता. वाढत्या रोडरोमियोंवर आळा घालण्यासाठी कोणताही अन्याय सहन न करता थेट कारवाई करण्यासाठी निर्भयपणे पुढे यावे. तसेच ज्या ठिकाणी निर्भया पथकाचा कार्यक्रम घेतला जातो. त्या ठिकाणी देखील इच्छुक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ‘पोलीस सखी’ व ‘पोलीस मित्र’ म्हणून काम करू शकतात व गोपनीय माहिती पोलिस अधिकाऱ्यांना देऊ शकतात. अशा निर्भया, सखी किंवा पोलिस मित्रांची नावे पूर्णपणे गोपनीय ठेवली जातात.’ असेही सांगितले.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
निर्भया पथकाच्या कामगिरी बाबत माहिती देताना महिला पोलीस शिपाई कुट्टे यांनी म्हणाल्या की, ‘आय.पी.सी कलम ३०५ अंतर्गत छेडछाड करणे,मुलींना इशारा करणे, पाठलाग करणे, मुलींसोबत गैरवर्तणूक करणे, असे घडल्यास किंवा आढळल्यास त्या दोषीवर गुन्हा दाखल करून मोठी कारवाई देखील केली जाते. तसेच पालकांनी समाजातील चांगले काय, वाईट काय, याचा फरक सांगून वेळोवेळी मुलांना योग्य मार्गदर्शन करावे.’ असे सांगितले. लोटस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री चव्हाण म्हणाल्या की, ‘पोक्षो कायदा अंतर्गत आम्ही संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्कूलमध्ये व कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कमिटी स्थापन केली असून याच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाते. त्यामुळे स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये गैरवर्तन घडत नाहीत आणि भविष्यात देखील घडू नयेत यासाठी आवश्यक ती काळजी घेत आहोत.’ असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिक्षक संपत लवटे, नामदे, कसबे, दादासाहेब पटेल, जगन्नाथ अर्जुन, मयूर वागज, दीक्षित, घोलप, दिवसे, सचिन निकम, अक्षय रुपनर, अस्मा शेख, भोसले, शिनगारे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.सी. एम.एस.चे प्रमुख समीर मुलाणी यांनी केले तर आभार डॉ जयश्री चव्हाण यांनी मानले.
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________





0 Comments