आटपाडी , खानापूर , जत , कवठेमहंकाळ हे तालुके आणि तासगांव , मिरजेचा काही भाग नेहमीच दुष्काळात सापडत असे . यावर कायमचा उपाय म्हणून खुजगांवला , चांदोलीच्या दुप्पट - तिप्पट क्षमतेचे धरण व्हावे यासाठी लोकनेते राजारामबापू पाटील यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे . खुजगाव धरणाच्या निर्मितीतून शेतीसाठीचे पाणी दुष्काळी पट्टयाकडे उचलून नेण्याचे स्वप्न पाहणारे 'बापू' जिल्हयातले पहिले दुरदृष्टीचे नेते होते . त्यांच्या पश्चात टेंभू, ताकारी, म्हैशाळसह राज्यातल्या विविध योजनांना मोठी गती देण्याचे काम बापूंच्या सुपुत्राने म्हणजे आमदार जयंतराव पाटील यांनी आपल्या मंत्रीपदाच्या १५ वर्षात केले. अनुशेषाच्या नावाखाली रखडलेल्या सिंचन योजनांवर मार्ग काढण्यासाठी राज्यपाल महंमद फजल महोदयांना वस्तुस्थिती पटवून देत राज्यपालांना दुष्काळी दौऱ्यावर आणून जयंतरावांनी पार पाडलेली भूमिका अतुलनीय अशीच आहे . आजच्या ९९ व्या जयंती दिनाने सुरू झालेल्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बापूंच्या जीवन कार्याचा मागोवा घेत त्यांच्या पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्याचा केलेला हा प्रयत्न होय . गगनाला गवसणी घालणाऱ्या कार्यकर्तृत्वाच्या ' करोडोंके रोम रोम में बसनेवाले राजारामबापू पाटील' यांना कोटी कोटी प्रणाम. आटपाडी तालुक्यात अनेक ठिकाणी उभारल्या गेलेल्या शाळा , पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या अनेक रहाटांच्या भल्या मोठाल्या विहीरी , आटपाडी भोवतीच्या शेतीला उर्जितावस्था देणारा आटपाडीचा तलाव , रस्ते , आरोग्याच्या सुविधा यासाठी बापूंनी योगदान दिलेच तथापि सांगोला तालुक्यातल्या चिंध्यापीरला चाललेला माणगंगा सहकारी साखर कारखाना , आटपाडी जवळच्या सोनारसिद्ध येथे होण्यासाठी बापूंच्या मुख्यमंत्री महोदयां जवळच्या शिष्टाईलाच यश आले होते . विद्यार्थी ,शेतमजूर संघटना अध्यक्ष पदापासून आटपाडी तालुका जनता पक्षाच्या अध्यक्षपदापर्यत मजल मारणाऱ्या , आपल्या अमोघ वक्तृत्वाने जिल्हाभर नाव कमावलेल्या युवा नेता रावसाहेबकाका पाटील यांचा राजकारण प्रवेश, त्या पुढचा प्रवास बापूंच्या पाठबळानेच साकारलेला . बापूंच्या प्रेरणा आणि पाठबळाने स्थापन झालेल्या राजारामबापू हायस्कूल आणि श्री .भवानी शिक्षण संस्थेच्या नेतृत्वाची ,सारथ्याची भूमिका बापूंच्या पश्चात रावसाहेबकाका पाटील यांच्याकडे येणे , हे बापूंच्याच आशीर्वादाचे फलीत होते, असे मानणारा मी एक छोटा बापू - साहेब प्रेमी कार्यकर्ता आहे . १९७७ -७८ साली बापूंच्या नावच्या आटपाडीतल्या हायस्कुलचा मी विद्यार्थी होतो . ते राजारामबापू हायस्कूल आणि घरापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या त्यावेळच्या युवा नेता रावसाहेबकाका पाटील यांच्या आणि हायस्कुल मधील बापूंच्यावरील प्रेमाच्या वातावरणाने मी ही बापूंच्या विचारधारेवर प्रेम करू लागलो.
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
राजकारण, समाजकारण थोडं कळण्याच्या त्या तेरा चौदा वर्षाच्या वयात बापूंच्या आटपाडीतल्या कार्यक्रमांना जाणे , त्यांच्या मिरवणूकीतल्या लेझीम , ढोल पथकाचा घटक बनने , प्रसंगी रावसाहेबकाकां बरोबर इस्लामपूरला जाणे असे उपक्रम करीत असे . त्यावेळचे केंद्रिय गृह राज्यमंत्री सोनूसिंग पाटील यांचा बापूं समवेत चा आटपाडी दौरा , तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांच्या समवेतचा मंत्री बापूंचा आटपाडी दौरा आजही आठवतो . अवघ्या सात वर्षानंतर म्हणजे १९८४ ला बापू सर्वांनाच सोडून गेले त्यामुळे त्यांच्या सोबत फारसे प्रत्यक्ष बोलण्याचा, त्यांच्यासमवेत वावरण्याचा योग आलाच नाही . बापू गेले त्यावेळी मी बारावीचा विद्यार्थी होतो .तथापी ते गेल्यापासून त्यांच्या जयंती , पुण्यतिथीला रावसाहेबकाकांच्या समवेत इस्लामपूरला कारखान्यावर जावून त्यांना आदरांजली वाहण्याचा दोन - तीन वेळचा अपवाद वगळता आज अखेर ३४ वर्षे सातत्य राहीले आहे . मात्र गत ३५ वर्षात बापूंचे जीवन चरित्र अभ्यासण्याचा , त्यांची महती , कार्यप्रणाली जाणून घेण्याचा आणि बापूंच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आमदार जयंतराव पाटील यांच्या समवेत असंख्य वेळा बोलण्याचा , वावरण्याचा, त्यांना कार्यक्रमांना आणण्याचा , आपुलकीचा नेहमीच योग आला आहे. आपल्या आयुष्यातील ४० वर्षे राजकारण , समाजकारण , शिक्षण , शेती, सहकार , उदयोग इत्यादी अनेक क्षेत्रात कार्यरत राहीलेल्या बापूंनी केलेले कार्य अभ्यासताना अक्षरशः थक्क होवून जाते . सर्वच क्षेत्रात नेत्रदिपक काम करणाऱ्या बापूंनी इतर राजकारण्यांपेक्षा आपण वेगळे होतो हेच कृतीशील दाखवून दिले आहे .जनतेच्या प्रश्नांपर्यत भिडण्यासाठी बापू त्यांच्या वाडया वस्त्यांवर जायचे . त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सुटेपर्यत कार्यरत रहायचे , अनेक वेळा अशा वस्त्यांवर गरीबांच्या चटणी, भाजी भाकरीचा आस्वाद घेत बापूंनी अनेक वस्त्यांवर मुक्कामही केलेला होता. जनतेशी नाळ जोडलेले, जनतेतच मिसळणारे , त्यांचेच होणारे बापू एकमेव नेते असावेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेतीचे शाश्वत पाणी, रस्ते, वीज इत्यादींच्या पूर्तीसाठी बापू नेहमीच समर्पित व्हायचे . तालुका, जिल्हा, राज्यस्तरावरील शेकडो किलोमीटर पदयात्रांद्वारे जनतेशी संवाद साधणाऱ्या बापूंनी जनतारुपी पांडुरंगासाठी पदयात्री, वारकरी बनत आयूष्यभर जनसेवेचा ध्यास घेतल्याचे दिसून येते. विद्यार्थी दशेतल्या राजारामबापूंनी स्वातंत्र पूर्व काळात इंग्रजांविरोधी चळवळीत भाग घेत आपल्या सामाजीक कार्यास सुरुवात केली .परदेशी मालावर बहिष्कार व त्याची होळी करण्याचे काम त्यांनी केले .दलितांना मंदिर प्रवेशासाठी आग्रही राहीलेल्या बापूंनी खादी , चरखा संघ , युवक सेवादलाच्या विविध उपक्रमांना प्रोत्साहन दिले . कासेगावातून राजकीय जीवनाची सुरूवात करणाऱ्या बापूंनी सर्वप्रथम शिक्षणाला प्राधान्य दिले.आझाद विद्यालय आणि सर्वोदय वस्तीगृहाची सुरुवात करून प्रारंभी काही काळ ज्ञानदान करणाऱ्या बापूंनी साने गुरुजींच्या जीवन प्रणालीला आदर्श मानले .
_________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
बापूंनी स्थापन केलेल्या कासेगांव शिक्षण संस्थेच्या विविध विभागांच्या बहुसंख्य शाखांमधून हजारो विदयार्थ्यानी ज्ञानार्जन करून आपले विश्व साकारले आहे . बापूंनी स्थापन केलेल्या इंजिनीअरींग कॉलेजच्या हजारो प्रज्ञावंत अभियंत्यांनी जगाच्या काना कोपऱ्यात आपले दैदिप्यमान कौशल्य , कसब सिध्द करून राजारामबापू इंजिनिअरींग कॉलेजच्या गुणवत्तेची पताका जगभर फडकाविली आहे . आज ही कासेगांव शिक्षण संस्थेचे विविध विभागातील हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करून जगाला कवेत घेणारी गरूड भरारी मारत आहे. सातारा लोकल बोर्डावर बिनविरोध निवडून जात स्कुल बोर्डाचे चेअरमन बनलेल्या बापूंनी गाव तिथे शाळा व सक्तीच्या मोफत शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी केली . सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष बनल्यानंतर बापूंनी रस्ते , पंचायत इमारती, वाचनालये, नदी काठावरील आणि ग्रामीण भागातील शेकडो गावांना पिण्याच्या पाण्याची सोय , इत्यादी सोयी सुविधा करताना शासकीय बजेटचा पूरेपूर वापर केला . सांगली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर बापूंनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान यात्रेत सहभाग घेतला . या दरम्यान त्यांची अखिल भारतीय तंबाखू कमेटीवर शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवड झाली .पूणे विभाग पंचायत मंडळाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट हौसींग फायनान्स बोर्डाचे चेअरमन आणि पूणे विद्यापीठ कोर्ट सदस्य बनलेले बापू १९५९ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले . त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पक्षाने विधानसभा , लोकसभा निवडणूकीत नेत्रदिपक कामगिरी करत सत्ता खेचून आणली . याच दरम्यान उभारल्या गेलेल्या सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर कारखाना निर्मितीत त्यांनी पुढाकार घेतला . लोकशाही व सामाजीक संस्था यांच्या अभ्यासासाठी इंग्लंडचा दौरा केलेल्या बापूंना शिवाजी विद्यापीठ स्थापना समितीत सदस्य , सिनेटर होण्याची संधी लाभली . १९६२ मध्ये वाळवा मतदार संघातून आमदार झालेल्या बापुंना राज्याच्या मंत्रीमंडळात महसूल व वन खात्याचे उपमंत्री म्हणून काम करण्याची संधी लाभली . १९६५ सालच्या राज्य मंत्रीमंडळात महसूल खात्याचे कॅबीनेट मंत्री बनलेल्या बापूंनी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या खाते पुस्तिकेची निर्मिती केली . पुढे , नागरी पुरवठा , सहकार , उद्योग , वीज खात्याचे कॅबीनेट मंत्री राहीलेल्या बापूंनी १४ हजार गावात वीज देण्याचे काम करून वेगवान मंत्री म्हणून नाव करताना राज्यातल्या अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारून उद्योगांना चालना दिली .जनतेला, शेतकऱ्यांना उपयोगी ठरतील असे अनेक प्रस्ताव त्यांनी संमत करून घेतले , उद्योजकांना विशेष सवलती उपलब्ध करून देणाऱ्या बापूंनी वाळवा ग्राहक भांडाराची , औद्योगिक वसाहतीची उभारणी केली .नंतर बापूंनी वाळवा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीला प्रारंभ केला , जिल्हा , राज्यस्तरावरून केला
गेलेला विरोध मोडून काढीत १४ महिन्यातच कारखाना उभारून बापूंनी सर्वांवर मात केली .
_________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
१९७० मध्ये उद्योग विकासासाठी जपान , अमेरिका दौरा करून आल्यानंतर बापूंनी, लोकशाही क्षितीजे व आधुनिक जपान या पुस्तकाचे लेखन केले .१९७२ च्या विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर विषयांवर परखडपणे मते मांडणारे , प्रश्न विचारणारे सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून बापूंनी विधानसभा गाजविली . शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम, सुफलाम व्हावे , दुष्काळी भागाला उचलून पाणी देता यावे आणि चांदोली पेक्षा जास्त क्षमतेचे खुजगांव येथे धरण व्हावे म्हणून त्यांनी १९७३ मध्ये खुजगांव येथे १ लाख लोकांची भव्य परिषद घेतली .१९७४ साली मुंबई महानगर पालिका मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडल्या गेलेल्या बापूंनी त्या सभागृहातही नेत्रदीपक काम केले . त्याच कालावधीत त्यांनी कृषी विकास संघाची भागात स्थापना केली .२० कलमी कार्यक्रम राबवण्यासाठी वाळवा तालुक्यातील ९७ गावांची ६५० कि.मी. ची पदयात्रा करीत बापूंनी नवा अध्याय घालून दिला . त्याच वर्षी म्हणजे १९७५ ला वाळवा दुध संघाची स्थापना करून बापूंनी संस्थात्मक जाळे विणण्याचे काम चालुच ठेवले . दरम्यान जनता पक्षात प्रवेश केलेल्या बापूंना उपाध्यक्षपद आणि सलग दोनदा अध्यक्षपद भूषविण्याचा बहुमान मिळाला . १९७९ च्या पुलोद च्या मंत्रीमंडळात ग्रामीण विकास , कायदा , न्याय खात्याचे कॅबीनेट मंत्रीपद भूषविणाऱ्या बापूंनी काही काळ अर्थमंत्री म्हणून ही काम केले . शेतकरी सहकारी सुतगिरणी , वाळवा बँकेची उभारणी करून बापूंनी आणखी दोन नव्या उद्योग, व्यवसायाची भर तालुक्याच्या विकासात घातली . मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बापूंना , जनतेकडून दिल्या गेलेल्या पाच लाखाच्या थैलीतूनच राजारामबापू विकास प्रतिष्ठान व सामाजीक .ट्रस्टची स्थापना केली गेली . जळगांव ते नागपूर या दरम्यान शेतकऱ्यांसाठी काढलेल्या शेतकरी दिंडी , पदयात्रेनंतर बापूंना वर्धा येथे अटक करण्यात आली .४६५ किलोमीटर अंतराच्या हजारो लोकांसमवेतच्या या पदयात्रेने राज्याचे लक्ष वेधून घेतले होते . १९८२ साली शेतमजुरांच्या मागण्यांसाठी इस्लामपूर तहसील कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढणाऱ्या बापूंनी सांगली ते उमदी ही २५० किलोमीटरची पदयात्रा काढून विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधून घेतले होते .साखराळे कारखान्यावर अॅसिटोन प्रकल्प उभारण्याबरोबरच जवळच अभियांत्रीकी तंत्रनिकेतनची स्थापना करणाऱ्या बापूंनी आणखी दोन नव्या व्यवस्था साकारल्या . सर्वसामान्य जनता शहाणी झाली पाहीजे , वैचारीक दृष्टया समृध्द झाली पाहीजे , सर्वार्थाने पुढे आली पाहीजे याच ध्यासाने चिंतन शिबीरांचे आयोजन बापू नेहमी करीत . राज्य, देशस्तरावरच्या नामंकीत वक्त्याला , तज्ञाला , विचारवंत , प्रज्ञावंताला आमंत्रीत करून त्यांच्या अमोघ वाणीतून सर्वांना ज्ञानामृत वाटणाच्या संकल्पनेतूनच राजारामबापू ज्ञान प्रबोधीनीची निर्मिती केली गेली .
_________________________________________________________________________________
राष्ट्रीय नेते , माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या पदयात्रेत ११०० किलोमीटर सहभागी झालेल्या बापूंची ती शेवटचीच पदयात्रा ठरली .सर्दीच्या आजाराने दवाखान्यात दाखल झालेल्या बापूंनी संघटने संदर्भातली एक हजार पत्रे पाठवून दवाखान्यातही आपले काम चालुच ठेवले . तथापि १७ दिवसांच्या उपचारानंतरही बापू आजारातून पुन्हा बाहेर येवू शकले नाहीत . १७ जानेवारी १९८४ रोजी बापूंचे निधन झाले . लाखो - करोडो चाहत्यांना तीव्र दु:खात लोटून गेलेल्या बापूंवरचे जनता जनार्दनांचे प्रेम आजही तसेच आबाधीत आहे . आपल्या प्रचंड कामाच्या माध्यमातून जनतेला अभिप्रेत असणारे रामराज्य साकारणाऱ्या बापूंच्या पश्चात त्यांचे सुपुत्र आमदार जयंतराव पाटील यांनी ही बापूंनी निर्माण केलेले संस्था , उद्योग , संघटनांचे साम्राज्य जतन केलेच परंतू अनेक नव्या संस्था निर्मिती बरोबर पूर्वीच्या संस्थांना प्रचंड मजबुतीचे , त्यांच्या शाखा विस्ताराचे मोठे काम केले.तसेच , बापूंच्या कृतार्थ जीवनाचा गौरव ठरेल असे कासेगांव येथे साकाराल्या गेलेल्या भव्य दिव्य पदयात्री स्मारकाचे लोकार्पण राष्ट्रपती सौ . प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय नेते शरद पवारसाहेबांच्या उपस्थितीत करून जनता जनार्दनाच्या सेवेचे आयूष्यभर पदयात्री, वारकरी राहीलेल्या बापूंच्या कार्याचा गौरव करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे .बापू नंतरच्या ३५ वर्षात जयंतरावांनी वाळवा तालुक्याला, राज्यातल्या अव्वल तालुक्यात गणना होईल इतक्या समृध्दतेच्या , संपन्नतेच्या उंचीवर नेऊन ठेवले आहे .सलग सहा वेळा आमदार राहीलेल्या जयंतरावनी सलग पंधरा वर्षे मंत्रीमंडळातील आघाडीचे कॅबीनेट मंत्रीपद भूषविताना अर्थ, नियोजन , ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि गृह खात्यांना लक्षवेधी न्याय दिला . राज्य , देशाला त्यांचा हेवा वाटेल अशा प्रचंड कार्यातूनच त्यांच्याकडे बापूंच्या प्रमाणेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद आले आहे . त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणि आघाडीतल्या पक्षांना अधिकाधिक मजबूती, स्थिरता देण्यासाठी बापू - साहेब प्रेमी वाळवा तालुका वाशीय आणि राज्यातल्या बापू - साहेब प्रेमींनी आतापासून कामाला लागले पाहीजे . राज्याचे मुख्यमंत्री पद भुषविण्याची धमक , क्षमता असणाऱ्या बापूंचे अपूरे स्वप्न जयंतरावांच्या रूपाने भविष्यात सत्यात उतरवण्यासाठी आणि वाळवा तालुका व सांगली जिल्ह्याला देशातला सर्वात प्रगतीशील तालुका , जिल्हा बनविण्यासाठी प्रत्येक बापू - साहेब प्रेमींनी स्वतःला झोकून देवून काम करणे हीच बापूंना खरीखुरी आदरांजली ठरेल . वाळवा तालुका वाशीयांच्या अंतःकरणात घर करून राहीलेले बापू - साहेब आणि बापू व साहेबांच्या रोम रोम में बसनेवाले वाळवा तालुका वाशीय, हे अतूट प्रेमाचे नाते असेच ता कयामत तक आबादीत रहावे हीच त्या विधात्याकडे नम्र प्रार्थना .......
_____________________________________________________________







0 Comments